रावतेंचा फर्स्ट गियर !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 22, 2017 00:28 IST2017-08-22T00:28:10+5:302017-08-22T00:28:38+5:30

विदर्भाच्या संपर्क प्रमुखपदाची जबाबदारी स्वीकारल्यानंतर परिवहन मंत्री दिवाकर रावते यांचा पहिलाच नागपूर दौरा असल्यामुळे शिवसैनिकांमध्ये उत्साहाचे वातावरण होते.

Rawat's first gear! | रावतेंचा फर्स्ट गियर !

रावतेंचा फर्स्ट गियर !

ठळक मुद्दे‘कॉर्पोरेट आॅफिस’वर नाराजी : शिवसैनिक बसणार कुठे ?

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : विदर्भाच्या संपर्क प्रमुखपदाची जबाबदारी स्वीकारल्यानंतर परिवहन मंत्री दिवाकर रावते यांचा पहिलाच नागपूर दौरा असल्यामुळे शिवसैनिकांमध्ये उत्साहाचे वातावरण होते. त्यातच कार्यालयात ते विशेष संवाद साधणार असल्यामुळे तर विदर्भातील प्रमुख पदाधिकारी तयारीनिशी पोहोचले होते. मात्र गणेशपेठ येथील कार्यालयात पाय ठेवताच रावते यांनी स्थानिक नेत्यावर फर्स्ट गिअर टाकला. त्यांच्या संतापाचे कारण होते कार्यालयाची जागा व स्वरूप. हे पक्ष कार्यालय कमी अन् ‘कॉर्पोरेट आॅफिस’ जास्त वाटत आहे. मात्र बैठकीची व्यवस्था काहीच नाही, या शब्दांत त्यांनी आपली नाराजी व्यक्त केली व थेट रविभवनाकडे सर्वांना येण्याचे फर्मान सोडत कार्यालयातून काढता पाय घेतला.
दिवाकर रावते रविवारी नागपुरात दाखल झाले. सोमवारी नियोजित कार्यक्रमानुसार ते गणेशपेठेत स्थित पक्ष कार्यालयात स्थानिक प्रमुख कार्यकर्त्यांशी चर्चा करणार होते. यासाठी विदर्भातून प्रमुख पदाधिकारी पोहोचले होते.
दुपारी १२ च्या सुमारास रावते पक्ष कार्यालयात आले. तळागाळात काम केलेल्या रावतेंना पक्ष कार्यालयाचा ‘कॉर्पोरेट लूक’ पसंत पडला नाही. दोन डझनाहून अधिक पदाधिकाºयांना एकत्रित बैठकीला बसविण्यासाठी व्यवस्था नसल्याचे पाहून त्यांचा पारा चढला. ‘हे असे कसे पक्ष कार्यालय आहे. येथे बैठक कशी होणार’ या शब्दांत त्यांनी संताप बोलून दाखविला.
त्यानंतर तातडीने रविभवनाच्या सभागृहात बैठकीची व्यवस्था करण्यात आली. त्यांच्यासह सर्व पदाधिकारी सभागृहाकडे रवाना झाले. अखेर १.३० वाजता प्रत्यक्ष बैठकीला सुरुवात झाली.
कार्यकर्त्यांच्या अडचणी जाणून घ्या
रविभवनात पार पडलेल्या बैठकीला जिल्हाप्रमुख सतीश हरडे यांच्यासह प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते. शिवसेनेकडून विदर्भाकडे दुर्लक्ष झाल्याची कार्यकर्त्यांमध्ये भावना आहे. त्यामुळे कार्यकर्त्यांच्या अडचणी जाणून घेत त्यांच्यात नवी ऊर्जा आणण्याची आवश्यकता असल्याचा पदाधिकाºयांचा सूर होता. रावते यांनी पक्षाच्या संघटनात्मक बांधणीबाबत पदाधिकाºयांच्या भावना जाणून घेतल्या. विदर्भात पक्ष जुना नाही. गेल्या ४०-४५ वर्षांपासून पक्ष येथे अस्तित्व टिकवून आहे व आता आवाका वाढतो आहे. अनेक आमदारदेखील निवडून आले आहेत. ८० टक्के समाजकारणाच्या माध्यमातून जनतेपर्यंत जाण्याचा प्रयत्न करायची आवश्यकता असल्याचे यावेळी रावते यांनी सांगितले.

Web Title: Rawat's first gear!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.