शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण-अमेरिका युद्धाची शक्यता? तेहरानच्या इशाऱ्यानंतर कतारमधील अमेरिकन हवाई तळ केले रिकामे
2
अमेरिकेच्या टॅरिफ धोरणावर आज रात्री फैसला; ट्रम्प यांच्याविरोधात निकाल गेल्यास काय घडू शकतं?
3
हजारीबागमध्ये भीषण बॉम्ब ब्लास्ट, तिघांचा मृत्यू, एकजण गंभीर जखमी
4
मैत्री मैत्रीच्या ठिकाणी...! युद्धात इराणला साथ देणार नाही चीन? कारण काय?
5
धक्कादायक ! नागपुरात बाप झाला सैतान,पत्नीकडे ताबा जाऊ नये म्हणून पोटच्या मुलीची हत्या
6
"JJD हा लालूंचा खरा पक्ष"; राजद विलीनीकरणावर तेजप्रताप यांची तेजस्वींना थेट ऑफर
7
Petrol कार्सच्या तुलनेत Diesel कार्स जास्त मायलेज का देतात? जाणून घ्या यामागील विज्ञान...
8
बांगलादेशचा आडमुठेपणा! भारतात टी-२० वर्ल्डकप खेळण्यास नकार; आता आयसीसीकडे आहेत ३ पर्याय!
9
IND vs NZ : हर्षित राणानं ऑफ स्टंप उडवत डेवॉन कॉन्वेचा केला करेक्ट कार्यक्रम! गंभीरने अशी दिली दाद
10
मुस्लिमबहुल प्रभागांत रंगणार काँग्रेस-एमआयएम सामना! १३ जागांसाठी काँग्रेसची धडपड, शिंदेसेना चारही जागा राखणार?
11
डोंबिवलीत भाजपा अन् शिंदेसेनेत जोरदार राडा; ५ जणांना अटक, जखमींवर रुग्णालयात उपचार
12
Video - ई-रिक्षातील तरुणाचं अश्लील कृत्य; रणरागिणीने रस्त्यावरच घडवली चांगलीच अद्दल
13
"विना परवाना शस्त्र वाटणार, ज्याला हवं त्याने..."; योगी सरकारच्या मंत्र्याचं धक्कादायक विधान
14
भारतीय पासपोर्टला मिळाली ताकद, आता ५५ देशांमध्ये व्हिसा-मुक्त प्रवेशाची परवानगी
15
‘तातडीने इराण सोडा, मिळेल त्या वाहनाने बाहेर पडा’, भारतीय दूतावासाकडून आपल्या नागरिकांना सूचना
16
रॉकेट बनलाय हा पेनी स्टॉक, ५ दिवसांत दिला ६१% परतावा; फक्त २० रुपयांवर भाव! तुमच्याकडे आहे का?
17
भारतातील एक अनोखे मंदिर; जाणून घ्या ९९ लाख ९९ हजार ९९९ दगडी मूर्तींचे रहस्य...
18
"त्यांच्या शेवटाची वाट पाहत होता, हे स्वप्न नाही तर नमकहरामी"; अश्विनी जगतापांच्या स्टेटसने संघर्ष चव्हाट्यावर
19
Bala Nandgaonkar : "रात्र वैऱ्याची आहे, यावेळी मराठी माणूस चुकला तर..."; ठाकरेंच्या निष्ठावंताची भावुक पोस्ट
20
चोर असावा तर असा! आधी देवीची माफी मागितली, मग दागिने केले लंपास; Video व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

नागपुरात रेशन वाटप बंद, दुकानदारांनी पुकारला संप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 1, 2020 20:59 IST

कोरोनाच्या संकटात गरीब उपाशी राहू नये म्हणून रेशन दुकानदारही आपला जीव संकटात घालून काम करीत आहेत; परंतु त्यांची साधी दखलही शासनाने घेतली नाही, अशी खंत व्यक्त आम्हालाही कोविड योद्धा म्हणून घोषित करण्यात यावे, या मागणीसाठी रेशन दुकानदारांनी आज सोमवारपासून राज्यभरात संप पुकारत रेशन वितरण बंद केले आहे.

ठळक मुद्देकोविड योद्धा घोषित करण्याची मागणी

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : कोरोनाच्या संकटात गरीब उपाशी राहू नये म्हणून रेशन दुकानदारही आपला जीव संकटात घालून काम करीत आहेत; परंतु त्यांची साधी दखलही शासनाने घेतली नाही, अशी खंत व्यक्त आम्हालाही कोविड योद्धा म्हणून घोषित करण्यात यावे, या मागणीसाठी रेशन दुकानदारांनी आज सोमवारपासून राज्यभरात संप पुकारत रेशन वितरण बंद केले आहे.डॉक्टर, परिचारिका, पोलीस यांच्यासह रेशन दुकानदारही कोरोनाच्या संकटात आपला जीव धोक्यात घालून काम करीत आहेत. त्यामुळे त्यांनाही कोविड योद्धा घोषित करून प्रत्येक रेशन दुकानदाराला ५० लाख रुपयांचा विमा मिळावा. रेशन दुकानदारांचे कमिशन खूप कमी आहे. तेव्हा त्यांना चतुर्थ श्रेणी शासकीय कर्मचाऱ्यांचा दर्जा देऊन मानधन देण्यात यावे, ई-पॉस मशीनमध्ये दर महिन्याला बिघाड होतो. त्यामुळे सर्व्हर, नेटची समस्या दूर करावी. कोरोनाचे संकट संपेपर्यंत रेशन दुकानदार किंवा ग्राहकांचे थम्ब घेण्यात येऊ नये आणि प्रति कार्डधारकांना ४ लिटर केरोसिन देण्यात यावे, अशा मागण्या रेशन दुकानदारांनी केल्या आहेत. या मागण्यांकडे तातडीने लक्ष द्यावे, अन्यथा १ जून पासून रेशन वितरण बंद केले जाईल, असा इशाराही यापूर्वीच देण्यात आला होता. याअंतर्गत आज सोमवारी राज्यभरातील रेशन दुकानदारांनी संप पुकारला. नागपुरात विदर्भ रास्त भाव दुकानदार केरोसीन विक्रेता संघटनेच्या बॅनरअंतर्गत अन्नपुरवठा अधिकारी अनिल सवई यांना मागण्यांचे निवेदन सादर करण्यात आले. यावेळी विभागाबाहेर मागण्यांकडे लक्ष वेधत धरणे दिले. यावेळी संघटनेचे अध्यक्ष संजय पाटील, उमाशंकर अग्रवाल, प्रफुल्ल भुरा, रितेश अग्रवाल, सुनील जैस, मिलिंद सोनटक्के, राजेश कामडे, सुभाष मुसळे आदी उपस्थित होते.गरीब-गरजूंना फटकाकोरोनाच्या संकटात लॉकडाऊनमुळे गरिबांचे जगणे कठीण झाले होते. ते उपाशी राहू नये म्हणून शासनाने त्यांना तीन महिन्यांचे धान्य मोफत देण्याचे जाहीर केले आहे. एप्रिल व मे महिन्याचे धान्य वाटप झाले. जून महिन्याचे वाटप व्हायचे आहे. रेशन दुकानदारांच्या मागण्यांबाबत शासनाने तातडीने निर्णय न घेतल्यास आणि त्यांचा संप हा सुरूच राहिला तर गरीब-गरजूंना मोठा फटका बसण्याची शक्यता आहे.

टॅग्स :Strikeसंपfoodअन्न