कान्हाेलीबारा येथे ‘रास्ता राेकाे’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 16, 2021 04:11 IST2021-01-16T04:11:15+5:302021-01-16T04:11:15+5:30
लाेकमत न्यूज नेटवर्क वानाडाेंगरी : समृद्धी महामार्गाच्या कामामुळे कान्हाेलीबारा परिसरातून माेठ्या प्रमाणात गिट्टी व चुरीचे ओव्हरलाेड ट्रक धावतात. त्यामुळे ...

कान्हाेलीबारा येथे ‘रास्ता राेकाे’
लाेकमत न्यूज नेटवर्क
वानाडाेंगरी : समृद्धी महामार्गाच्या कामामुळे कान्हाेलीबारा परिसरातून माेठ्या प्रमाणात गिट्टी व चुरीचे ओव्हरलाेड ट्रक धावतात. त्यामुळे राेडची अपस्था दयनीय झाली असून, उडणाऱ्या धुळीमुळे राेडलगतच्या पिकांचे नुकसान हाेत आहे. यामुळे या वाहतुकीला आळा घालावा, या मागणीसाठी संतप्त नागरिकांनी गुरुवारी (दि. १४) दुपारी कान्हाेलीबारा (ता. हिंगणा) येथे ‘रास्ता राेकाे’ आंदाेलन केले. यात त्यांनी गिट्टी व चुरीची ओव्हरलाेड वाहतूक करणारे १३ ट्रक अडवून पाेलिसांच्या स्वाधीन केले.
काही वर्षापासून समृद्धी महामार्गाचे काम सुरू आहे. हा महामार्ग हिंगणा तालुक्यातून गेला असून, राेडच्या निर्मितीला लागणाऱ्या विविध साहित्याची कान्हाेलीबारा परिसरातून ट्रक व टिप्परद्वारे वाहतूक केली जाते. ही वाहने ओव्हरलाेड असल्याने या भागातील रस्ते पायी चालण्याच्या लायकीचे राहिले नाहीत. पाऊस काेसळताच संपूर्ण राेड चिखलमय हाेत असून, काेरड्या दिवसात राेडवरील धूळ उडत असल्याने नागरिकांना त्रास हाेताे. ती धूळ राेडलगतच्या शेतातील पिकांच्या पानांवर बसत असल्याने पिकांचेही माेठे नुकसान हाेत आहे.
राेडवर पडलेली गिट्टी व खड्यांमुळे अपघात हाेत आहेत. या ओव्हरलाेड वाहतुकीला आळा घालण्याची वारंवार मागणी करूनही प्रशासनाने याकडे लक्ष दिले नाही. त्यामुळे संतप्त नागरिकांनी गुरुवारी (दि. १४) दुपारी कान्हाेलीबारा परिसरात ‘रास्ता राेकाे’ आंदाेलन केले. यात त्यांनी केवळ गिट्टी व चुरीची ओव्हरलाेड वाहतूक करणारे १३ ट्रक अडविले. त्यानंतर पाेलिसांना सूचना देत सर्व ट्रक पाेलिसांच्या स्वाधीन केले. या आंदाेलनात पंचायत समिती सदस्य संजय धोडरे, सरपंच जितेंद्र बोटरे, उपसरपंच प्रशांत गव्हाळे, ग्रामपंचायत सदस्य गुणवंत वास्कर, रविचंद गव्हाळे, मिलिंद बुधबावरे यांच्यासह नागरिक व शेतकरी सहभागी झाले हाेते.
...
बैठक घेण्याचे आश्वासन
आंदाेलनाची माहिती मिळताच पाेलीस निरीक्षक सपना क्षीरसागर, उपनिरीक्षक मनाेज ओरके यांनी आंदाेलनस्थळ गाठले. त्यांनी आंदाेलकांशी चर्चा केली. या पाेलीस अधिकाऱ्यांनी एसीपी अशाेक बागूल यांच्याशी फाेनवर चर्चा केली. त्यानंतर त्यांनी ही समस्या साेडविण्यासाठी ग्रामपंचायत पदाधिकारी, लाेकप्रतिनिधी, शासकीय अधिकारी व कन्स्ट्रक्शन कंपनीचे अधिकारी यांची संयुक्त बैठक बाेलावण्याचे व त्यात चर्चा करून ताेडगा काढण्याचे आश्वासन दिले. त्यामुळे आंदाेलन मागे घेण्यात आले.