राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक
By Admin | Updated: September 26, 2016 03:02 IST2016-09-26T03:02:47+5:302016-09-26T03:02:47+5:30
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक आता खाकी हाफ पँटऐवजी तपकिरी रंगाच्या पूर्ण पँटमध्ये दिसत आहे.

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक आता खाकी हाफ पँटऐवजी तपकिरी रंगाच्या पूर्ण पँटमध्ये दिसत आहे. विजयादशमी सोहळ््याच्या पार्श्वभूमीवर रविवारी रेशीमबाग मैदानावर स्वयंसेवकांनी रंगीत तालीम केली. गणवेश बदलण्याचा निर्णय मार्च महिन्यात राजस्थानातील प्रतिनिधी सभेत एकमुखाने घेण्यात आला होता. संघाने १९४० मध्ये गणवेशात अंशत: बदल केला होता. यापूर्वी खाकी रंगाचा सदरा आणि खाकी रंगाची हाफ पँट असा गणवेश होता. मात्र, १९४० मध्ये त्यात बदल करून पांढऱ्या रंगाचा सदरा व खाकी हाफ पँट असा गणवेश करण्यात आला. तर १९७३ मध्ये चामड्याच्या बुटांची जागा रेक्झिन बुटांनी घेतली होती. शहरातील स्वयंसेवकांची संख्या लक्षात घेता मागील महिन्यातच १० हजार गणवेश आले होते.