विद्यापीठाच्या प्रवेश पुस्तिकेतच राष्ट्रसंतांचा जीवन परिचय छापावा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 31, 2021 04:09 IST2021-03-31T04:09:16+5:302021-03-31T04:09:16+5:30
नागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचे नाव असलेल्या नागपूर विद्यापीठाच्या सर्व प्रवेश पुस्तिकांमध्ये महाराजांचा संक्षिप्त जीवन परिचय छापला जावा, ...

विद्यापीठाच्या प्रवेश पुस्तिकेतच राष्ट्रसंतांचा जीवन परिचय छापावा
नागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचे नाव असलेल्या नागपूर विद्यापीठाच्या सर्व प्रवेश पुस्तिकांमध्ये महाराजांचा संक्षिप्त जीवन परिचय छापला जावा, तसेच प्रत्येक फॅकल्टीमध्ये दरवर्षी महाराजांच्या जीवनचरित्रावर एक पेपर घेतला जावा, अशी मागणी श्रीगुरुदेव युवामंचचे प्रवर्तक ज्ञानेश्वर दुर्गादास रक्षक यांनी केली आहे.
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या अंतर्गत येणाऱ्या अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्याने राष्ट्रसंतांच्या चित्रावर एनिमेशन करून व्हिडिओ तयार केला. तो सोशल मीडियावरून व्हायरल झाला. संबंधित विद्यार्थ्याला पोलिसांनी योग्य ती समज दिली असली तरी ही विकृत मनोवृत्ती विद्यार्थ्यांमध्ये बळावू नये व महाराजांचे जीवनकार्य विद्यार्थ्यांपर्यंत पोहचावे यासाठी विद्यापीठाने यासाठी पुढाकार घ्यावा, तसेच एम.ए. तुकडोजी विचारधारा विभाग सक्षम करण्यासाठी या अभ्यासक्रमाला युजीसीची मान्यता मिळावी, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली आहे. राष्ट्रसंतांचे विचार पोहचविण्यात गुरुदेवभक्त कमी पडल्याने असे प्रकार घडत असल्याची खंत व्यक्त करून संबंधित विद्यार्थ्याची भेट घेऊन त्याला राष्ट्रसंतांचे जीवनचरित्र समजवून सांगण्याचा प्रयत्न आपण करणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे.