शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसांत दाेनदा प्रवासी लटकले; सीएसएमटी ते वडाळ्यापर्यंत वाहतूक कोलमडली
2
अमित शाहांच्या मॉर्फ्ड व्हिडीओ प्रकरणी X कडून मोठी कारवाई, झारखंड काँग्रेसचं अकाऊंट केलं बंद
3
आजचे राशीभविष्य - २ मे २०२४; व्यापारासाठी दिवस उत्तम, आर्थिक बाबी मार्गी लागतील
4
२८-१५-५ महायुतीचा फॉर्म्युला; नाशिक, ठाणे शिंदेसेनेला, पालघर भाजपकडे
5
किंमत वाढूनही आपण खरेदी केले टनाने सोने; भारतीयांनी तीन महिन्यांत घेतले १३६.६ टन सोने
6
जीएसटीने भरली सरकारची तिजोरी; एप्रिलमध्ये २.१० लाख कोटींची वाढ
7
अमेरिकेपेक्षा भारतातच ‘एआय’चा वापर अधिक; तंत्रज्ञान स्वीकारण्यात देश सर्वात आघाडीवर
8
पहिल्या दोन टप्प्यांतील मतदानाची अंतिम टक्केवारी जाहीर; ३ टक्क्यांची वाढ
9
राज ठाकरे सभा घेऊन कोणाच्या वरातीत नाचणार? सभेसाठी मनसेच्या अर्जावर उद्धवसेनेची टीका
10
भाजप-उद्धवसेना फक्त एका ठिकाणी समोरासमोर; गळ्यात गळे घालून फिरणारे शिवसैनिक एकमेकांच्या विरोधात
11
मुंबईत षटकार मारणार, राज्यात १५ जागा जिंकणार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विश्वास
12
लॉकअपमधल्या चादरीच्या पट्टीने गळफास घेत बिश्नोई गँगच्या आरोपीची आत्महत्या
13
देशाच्या विकासात काँग्रेस अडथळा; ‘फॅमिली फर्स्ट’मुळे भारताचे नुकसान, योगी आदित्यनाथ यांचे टीकास्त्र
14
ठाण्यात दोघा माजी महापौरांमध्ये पुन्हा लढत; २०१४ मध्ये राजन विचारे विरुद्ध संजीव नाईक झाली होती लढत
15
प्रज्वल रेवण्णा उद्या बंगळुरूत येणार; आरोप तथ्यहीन असल्याचा दावा
16
पंतप्रधानांच्या पत्रात दडला निवडणुकीचा अजेंडा; उमेदवारांच्या माध्यमातून मतदारांना संदेश
17
श्रीकांत यांच्या कल्याणसाठी म्हस्केंना उमेदवारी देऊन विचारेंना बाय ? राजन विचारे यांना निवडणूक सोपी जाणार अशी चर्चा सुरू
18
शिंदेंना चढावी लागणार ‘व्हाइट हाउस’ची पायरी; गणेश नाईक यांचा नवी मुंबईसह आगरी मतांवर प्रभाव
19
मराठी पाट्यांचे रडगाणे; ९८ टक्के आस्थापनांनी न्यायालयाच्या आदेशाचे पालन केले
20
दगडफेकीपर्यंतचा प्रचार कोणत्या दिशेने जाणार?

नागपुरात  जुळ्या बहिणींवर अत्याचार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 20, 2018 11:40 PM

वर्धमाननगर परिसरातील एका घरमालकाने किरायदाराच्या दोन अल्पवयीन जुळ्या मुलींवर अत्याचार केल्याची घटना उघडकीस आली आहे. आरोपी घरमालक ४८ वर्षीय भाग्यवान चव्हाण आहे.

ठळक मुद्देघरमालकाचे कृत्य : वर्धमाननगरातील घटना

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : वर्धमाननगर परिसरातील एका घरमालकाने किरायदाराच्या दोन अल्पवयीन जुळ्या मुलींवर अत्याचार केल्याची घटना उघडकीस आली आहे. आरोपी घरमालक ४८ वर्षीय भाग्यवान चव्हाण आहे.पीडित मुलींचे आई-वडील चव्हाण याच्या घरी किरायाने राहतात. त्या दोघीही नऊ वर्षांच्या आहे. वडील पेंटिंगचे काम करतात. तर आई आठवड्याभरापासून एका दुकानात कामाला जाते. या दोघींबरोबर या दाम्पत्याला तिसरी पाच वर्षाची मुलगी आहे. शाळेला सुट्या असल्याने पीडित मुली व त्यांची पाच वर्षांची लहान बहीण घरीच राहते. आरोपी चव्हाण हा इलेक्ट्रिक फिटींगचे काम करतो. त्याला काम नसल्याने गेल्या आठवड्याभरापासून तो घरीच राहतो. चव्हाण याची पत्नी व पीडित मुलींचे आई-वडील कामावर गेल्यानंतर तो मुलींवर अत्याचार करीत होता. त्याने मुलींना जीवे मारण्याची धमकी दिली होती. सोमवारी चव्हाणचे कृत्य लहान बहिणीच्या नजरेत आले. तिने आईला घरी आल्यानंतर सांगितले. पीडितेच्या आईने हा प्रकार आरोपीच्या पत्नीला सांगितला. नवऱ्याच्या अशा कृत्याची पोलिसात तक्रार करण्यासाठी आरोपीच्या पत्नीनेही समर्थन दिले. मंगळवारी मुलींचे आई-वडील लकडगंज ठाण्यात पोहचले. दरम्यान आरोपी चव्हाण हा फरार झाला होता. पोलिसांनी त्याचा शोध घेऊन अटक केली. आरोपीवर अल्पवयीन मुलींवर अत्याचार केल्याप्रकरणी गुन्हा नोंदविला आहे.परिसरातील नागरिकांमध्ये संतापया घटनेमुळे परिसरातील नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे. आरोपी चव्हाण याला कठोर शिक्षा द्यावी, अशी मागणी केली आहे. चव्हाण याला १४ वर्षांचा मुलगा व १७ वर्षांची मुलगी आहे. त्याने गुन्हा कबूल केला आहे.

टॅग्स :Rapeबलात्कारnagpurनागपूर