नागपुरात सात वर्षाच्या बालिकेवर अत्याचार;आरोपी गजाआड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 25, 2020 00:24 IST2020-11-24T22:27:34+5:302020-11-25T00:24:00+5:30
Raped on minor girl , crime news सात वर्षाच्या बालिकेला आपल्या घरात नेवून तिच्यावर अत्याचार करण्याचा प्रयत्न करणाऱ्या आरोपीला पारडी पोलिसांनी अटक केली.

नागपुरात सात वर्षाच्या बालिकेवर अत्याचार;आरोपी गजाआड
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : सात वर्षाच्या बालिकेला आपल्या घरात नेवून तिच्यावर अत्याचार करण्याचा प्रयत्न करणाऱ्या आरोपीला पारडी पोलिसांनी अटक केली.
प्रीतम पटले (वय ३९) असे आरोपीचे नाव असून तो बांधकाम स्थळी मिस्त्री म्हणून काम करतो. त्याला पत्नी आणि दोन मुले आहेत.
सूत्रांच्या माहितीनुसार, सोमवारी दुपारी तो शेजारच्या चिमुकलीला घरात घेऊन गेला आणि अश्लील चाळे करू लागला. तेवढ्यात त्याचा मुलगा घरात पोहोचला. त्यामुळे या घटनेचा बोभाटा झाला. माहिती कळताच पारडी पोलीस तेथे पोहोचले. त्यांनी पीडित मुलीच्या पालकांना विश्वासात घेऊन घटनेबाबत विचारणा केली. त्यानंतर आरोपी प्रीतम पटलेला ताब्यात घेतले. चौकशीनंतर त्याला अटक करण्यात आली.
त्याच्याविरुद्ध पोक्सो कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून आज त्याला न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने त्याला २७ नोव्हेंबर पर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले.या घटनेच्या अनुषंगाने पारडी परिसरात उलटसुलट चर्चा सुरू आहे.