शहरं
Join us  
Trending Stories
1
धक्कादायक! नेपाळ्यांचा भारतीय सीमेत घुसून हल्ला; वनविभागाच्या पाच चौक्या जाळल्या
2
उद्याची सकाळ दरवाढीच्या झटक्यांची; टोलनंतर आता अमूलचे दूध २ रुपयांनी महागले
3
लोकसभेचे मतदान संपताच टोल दरात मोठी वाढ; आज मध्यरात्रीपासून लागू करण्याचे आदेश
4
जगन मोहन रेड्डींची खुर्ची धोक्यात; आंध्र प्रदेशच्या एक्झिट पोलनुसार भाजपा सत्तेत येण्याची दाट शक्यता
5
महत्वाचा अलर्ट! आयकर विभागाची L&T वर कारवाई; उद्या शेअर बाजारावर परिणाम होण्याची शक्यता 
6
"होय, मला भारताचा कोच व्हायला आवडेल, यापेक्षा मोठा...", गौतम गंभीरनं सोडलं मौन
7
ओडिशा विधानसभेत BJP आणि BJD यांच्यात टाय; दोन्ही पक्षांना 62-80 जागा मिळण्याची शक्यता
8
'देश वाचवण्यासाठी पुन्हा तुरुंगात जातोय; Exit Poll वर विश्वास ठेवू नका'- अरविंद केजरीवाल
9
एक्झिट पोल जाहीर होताच भाजपात गेलेल्या आप आमदाराने राजीनामा मागे घेतला
10
"संघाच्या शाखेत जाऊनही मी डाव्या विचारसरणीचा कारण...", आशुतोष गोखलेने मांडले राजकीय विचार
11
"एक्झिट पोलमध्ये अटलजी, पण पंतप्रधान बनले मनमोहन सिंग", काँग्रेस नेत्याचा मोठा दावा
12
सिक्कीमध्ये सत्ताधारी SKM चा दणदणीत विजय; भाजपचे सर्व उमेदवार पराभूत
13
अदा शर्मा सुशांतसिंह राजपूतच्या फ्लॅटमध्ये झाली शिफ्ट, म्हणाली, "या घरात मला..."
14
एनडीए ३९७ पार! एक्झिट पोलनंतर लगेचच e-मतदानाचा निकाल आला; पहा महाराष्ट्रात काय परिस्थिती?
15
"निवडणुकीआधी उद्धव ठाकरेंनी मोदींकडे भेटीची वेळ मागितली होती", शिंदे गटातील नेत्याचा मोठा गौप्यस्फोट
16
११ हजार कोटींच्या संपत्तीवरून वाद... आईने भावाला मारहाण केल्याचा ललित मोदींचा आरोप
17
आज ठाकरेंना नऊ जागा दाखवत असतील...; अजित पवार गटाला शून्य जागेवरून राष्ट्रवादीच्या मंत्र्याचा मोठा दावा
18
"निकालानंतर २० दिवसातच उद्धव ठाकरे मोदींसोबत..."; आमदार रवी राणांचा मोठा गौप्यस्फोट
19
इलेक्शन ड्युटीवरील कर्मचाऱ्यांसाठी काळ बनला सूर्य; 58 जणांचा मृत्यू, सर्वाधिक 'या' राज्यात...
20
"ज्या शाळेत शिकलात ती काँग्रेसने बांधलीय"; नाना पटोलेंचा संजय राऊतांना खोचक टोला

नागपुरात  आठ वर्षांच्या मुलीवर अत्याचार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 22, 2018 1:02 AM

एमआयडीसी येथे एका अल्पवयीन आरोपीने भाड्याने राहणाऱ्या आठ वर्षाच्या मुलीवर लैंगिक अत्याचार केला. गेल्या २४ तासात अत्याचारासह तीन मुलींचा विनयभंगही करण्यात आला आहे.

ठळक मुद्देअल्पवयीन आरोपीचे कृत्य : २४ तासात एकावर बलात्कार, तिघांचा विनयभंग

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : एमआयडीसी येथे एका अल्पवयीन आरोपीने भाड्याने राहणाऱ्या आठ वर्षाच्या मुलीवर लैंगिक अत्याचार केला. गेल्या २४ तासात अत्याचारासह तीन मुलींचा विनयभंगही करण्यात आला आहे.आठ वर्षाच्या मुलीवरील अत्याचाराचा हा प्रकार गेल्या महिनाभरापासून सुरू होता. पीडित मुलीचे आई-वडील आरोपी १६ वर्षीय मुलाच्या घरी भाड्याने राहतात. आई-वडील कामावर निघून गेल्यानंतर पीडित मुलगी व तिचा लहान भाऊ घरी राहतात. आरोपी अल्पवयीन दहावीचा विद्यार्थी आहे. त्याचे मुलीच्या घरी येणे-जाणे होते. तो एक महिन्यापासून मुलीवर अत्याचार करीत होता. तिला याबाबत काहीच कळत नव्हते. तिला खूप त्रास होऊ लागला तेव्हा १८ मे रोजी तिने आपल्या आईला सांगितले. आईने तिला डॉक्टरकडे नेले. डॉक्टरांनी तपासले असता खरा प्रकार लक्षात आला. आईने एमआयडीसी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी गुन्हा दाखल करून आरोपीला ताब्यात घेतले.अजनी येथील रहिवासी १५ वर्षीय अल्पवयीन मुलगी १९ मे रोजी सकाळी आपल्या घरी एकटी होती. त्याचवेळी वस्तीत राहणारा १८ वर्षीय आरोपी आकाश कुशवाह तिच्या घरी आला आणि दरवाजा बंद करून तिचा विनयभंग केला. त्याचप्रकारे हुडकेश्वर येथील रहिवासी १० वर्षीय मुलगी २० मे रोजी रात्री घरी एकटी होती. २४ वर्षीय आरोपी पिंटू शहाणे हा पाणी मागण्याच्या बहाण्याने घरी आला आणि तिच्याशी आपत्तीजनक व्यवहार केला. मुलीने आरडाओरड केल्यावर तो पळून गेला. नंदनवन येथील रहिवासी २२ वर्षीय तरुणी २० मे रोजी सायंकाळी तिच्या घरीच २६ वर्षीय नातेसंबंधातील आरोपी पप्पू सनोडियाने विनयभंग केला.

टॅग्स :Rapeबलात्कारnagpurनागपूर