बर्थ डे पार्टीला बोलवून तरुणीवर बलात्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 27, 2021 04:06 IST2021-06-27T04:06:24+5:302021-06-27T04:06:24+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर - बर्थ डे पार्टीच्या निमित्ताने मैत्रिणीला बाहेर जेवायला नेल्यानंतर परत येताना एका आरोपीने कारमध्येच तरुणीवर ...

Rape of a young woman by calling a birthday party | बर्थ डे पार्टीला बोलवून तरुणीवर बलात्कार

बर्थ डे पार्टीला बोलवून तरुणीवर बलात्कार

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर - बर्थ डे पार्टीच्या निमित्ताने मैत्रिणीला बाहेर जेवायला नेल्यानंतर परत येताना एका आरोपीने कारमध्येच तरुणीवर बलात्कार केला. तिने विरोध केला असता तिला बेदम मारहाणही केली. २३ जूनच्या रात्री घडलेल्या या घटनेची तक्रार तरुणीने शुक्रवारी सक्करदरा पोलिसांकडे नोंदवली.

२९ वर्षीय तरुणीने ऑनलाईन पोर्टलवर जॉबसाठी अप्लाय केला होता. तिच्या मोबाईलवर मार्च २०२१ मध्ये आरोपी वीरसिंग (वय २८) याने संपर्क साधला. त्यातून या दोघांची ओळख झाली. नंतर त्यांच्यात मैत्रीही झाली. २३ जूनला आरोपी वीरसिंगने त्याचा वाढदिवस असल्याचे सांगून जेवणासाठी आमंत्रित केले. तरुणीने संमती दिल्याने तो तिला अमरावती मार्गावर जेवायला घेऊन गेला. रात्री ८ च्या सुमारास तिकडून परत येत असताना आरोपीने कार रस्त्याच्या बाजूला लावली आणि तरुणीसोबत लगट सुरू केली. तिने विरोध केला असता आरोपीने तिला मारहाण करून तिच्यावर बलात्कार केला. तरुणीने या घटनेची तक्रार सक्करदरा पोलिसांकडे शुक्रवारी केली. पोलिसांनी विनयभंग करून बलात्कार केल्याच्या आरोपाखाली गुन्हा दाखल केला.

---

आरोपी फरार, पोलिसांकडून शोधाशोध

आरोपी वीरसिंग हा मूळचा गोंदियाचा रहिवासी आहे. गुन्हा दाखल होण्याचे संकेत मिळताच तो फरार झाला. एका सॉफ्टवेअर कंपनीत काम करतो आणि प्रतापनगरात राहतो, असे त्याने सांगितले होते, असे तरुणी म्हणते. तिच्या बयानात विसंगती येत असल्याने पोलीसही संभ्रमात आहेत. फरार वीरसिंग ताब्यात आल्यानंतर या घटनेतील दडलेले पैलू पुढे येतील, असे पोलीस अधिकारी म्हणतात.

---

Web Title: Rape of a young woman by calling a birthday party

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.