बलात्कारित पीडितेच्या मुलीची आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 4, 2021 04:11 IST2021-03-04T04:11:03+5:302021-03-04T04:11:03+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर - पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या तरुणीला तिच्या फेसबूक फ्रेण्डने ब्लॅकमेल करून रोकड उकळली. तिच्यावर बलात्कारही ...

Rape victim's daughter commits suicide | बलात्कारित पीडितेच्या मुलीची आत्महत्या

बलात्कारित पीडितेच्या मुलीची आत्महत्या

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर - पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या तरुणीला तिच्या फेसबूक फ्रेण्डने ब्लॅकमेल करून रोकड उकळली. तिच्यावर बलात्कारही केला. मुलीचे भविष्य अंधकारमय दिसत असल्याने नैराश्य आलेल्या तिच्या पित्याने विष प्राशन करून आत्महत्या केली. या संतापजनक प्रकरणाचा उलगडा झाल्यानंतर हुडकेश्वर पोलिसांनी गुन्हा दाखल करून ब्लॅकमेल करणारा तरुण ज्ञानेश्वर येणूरकर (वय २२, रा. काटोल) याला अटक केली.

पीडित तरुणी (वय २०) पोलीस भरतीची तयारी करण्यासाठी नेहमी रेशीमबाग मैदानावर जात होती. तेथे तिचा फेसबूक फ्रेण्ड आरोपी येणूरकर यायचा. सतत संपर्कामुळे त्यांच्यात प्रेमसंबंध जुळले. आपले नातेवाईक पोलीस विभागात असून, एका मंत्र्याशीही आपली ओळख असल्याची थाप मारून आरोपी येणूरकरने तरुणीला जाळ्यात ओढले. पोलीसमध्ये भरती होण्यापूर्वी शरीरावर कोणत्याही प्रकारचे डाग असायला नको, तरुणीला आधी विवस्त्रावस्थेतील फोटो, तसेच नंतर तिला तसाच व्हिडिओ काढून पाठवायला लावला. प्रेमसंबंध असल्याने कसलाही विचार न करता तरुणीने त्याला फोटो आणि व्हिडिओ पाठवला. तो व्हायरल करण्याचा धाक दाखवून आरोपीने तिच्यावर बलात्कार करणे सुरू केले. नंतर तो बदनामीची भीती दाखवून रोकडही मागू लागला. २०१९ ते २०२१ या दोन वर्षांत त्याने तिच्याकडून सुमारे चार लाख रुपये उकळले. दरम्यान, तरुणीच्या पित्याला हा प्रकार कळल्याने त्यांना जबर मानसिक आघात बसला. मुलीचे भवितव्य अंधकारमय दिसत असल्याने त्यांनी २० फेब्रुवारी रोजी हिंगणा शिवारात विष प्राशन करून आत्महत्या केली. त्यांची चाैकशी करणाऱ्या हिंगणा पोलिसांना हा धक्कादायक घटनाक्रम कळला. सोमवारी या प्रकरणात आरोपी येणूरकरविरुद्ध गुन्हा दाखल करून त्याला अटक करण्यात आली. प्रकरणाची सुरुवात हुडकेश्वर पोलीस ठाण्याच्या हद्दीतून झाल्याने पोलिसांनी बलात्कार करून ब्लॅकमेल केल्याचा गुन्हा दाखल केला. पुढील तपास सुरू आहे.

---

अनेकींना केले ब्लॅकमेल

आरोपी येणूरकर अत्यंत धूर्त आहे. त्याने अशाच प्रकारे अन्य काही तरुणींनाही ब्लॅकमेल केले असावे, असा संशय असून, पोलीस त्या संबंधाने चाैकशी करीत आहेत.

----

Web Title: Rape victim's daughter commits suicide

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.