अॅसिड फेकण्याची धमकी देऊन बलात्कार
By Admin | Updated: July 9, 2015 03:00 IST2015-07-09T03:00:40+5:302015-07-09T03:00:40+5:30
एका अल्पवयीन विद्यार्थ्याने त्याच्याच वयातील विद्यार्थिनीला चेहऱ्यावर तेजाब फेकण्याची धमकी देऊन बलात्कार केला. ही घटना इमामवाडा हद्दीत घडली.

अॅसिड फेकण्याची धमकी देऊन बलात्कार
अल्पवयीन विद्यार्थ्याचे कृत्य : मैत्रिणीलाच केले लक्ष्य
नागपूर : एका अल्पवयीन विद्यार्थ्याने त्याच्याच वयातील विद्यार्थिनीला चेहऱ्यावर तेजाब फेकण्याची धमकी देऊन बलात्कार केला. ही घटना इमामवाडा हद्दीत घडली. आरोपी १७ वर्षांचा असून त्याच्याच वयाची पीडित मुलगी १२ व्या वर्गात शिकते. दोघेही एकाच शाळेत शिकत होते. त्यांच्यामध्ये सातव्या वर्गापासून मैत्री आहे.
दहावी उत्तीर्ण केल्यानंतर दोघांनीही वेगवेगळ्या कॉलेजमध्ये प्रवेश घेतला. पीडित मुलीची दुसऱ्या कॉलेजमधील विद्यार्थ्याशी मैत्री झाली. त्यामुळे पीडित मुलीचे आरोपी विद्यार्थ्याला भेटणे कमी झाले.
यामुळे आरोपी विद्यार्थी संतापला होता. तो तिला भेटण्यासाठी बळजबरी करू लागला. त्याने तिला अॅसिड फेकून चेहरा विद्रुप करण्याची धमकी दिली. तिला नातलगात आणि मित्रांमध्ये बदनाम करण्याची धमकी देत तिला वेगवेगळ्या ठिकाणी नेऊन तिच्यावर बलात्कार केला. त्याच्या धमकीबाबत मुलीने कुणालाही काही सांगितले नाही.
पीडित मुलीने काही दिवसांपासून घरातून बाहेर निघणेच कमी केले. यानंतर तो तिला हाताची नस कापण्याची धमकी देऊ लागला. काही दिवसांपूर्वीच विद्यार्थिनीच्या घरच्यांना सर्व प्रकार लक्षात आला. त्यांनी इमामवाडा पोलिसांना सूचित केले.
मंगळवारी पुन्हा ठाण्यात जाऊन तक्रार दाखल केली. पोलिसांनी बलात्कार व अल्पवयीन मुलीच्या शोषणापासून संरक्षण अधिनियमांतर्गत गुन्हा दाखल करून आरोपीला अटक केली. (प्रतिनिधी)