दुरावलेल्या मैत्रिणीवर बलात्कार

By Admin | Updated: October 24, 2015 03:21 IST2015-10-24T03:21:16+5:302015-10-24T03:21:16+5:30

दुरावलेली मैत्रीण सोबत राहण्यास तयार नसल्याचे बघून एका गुंडाने तिला आपल्या घरात डांबून तिच्यावर सतत पाच दिवस पाशवी बलात्कार केला.

Rape of stranded friend | दुरावलेल्या मैत्रिणीवर बलात्कार

दुरावलेल्या मैत्रिणीवर बलात्कार

पाच दिवस डांबून ठेवले : पांढराबोडीतील घटना
नागपूर : दुरावलेली मैत्रीण सोबत राहण्यास तयार नसल्याचे बघून एका गुंडाने तिला आपल्या घरात डांबून तिच्यावर सतत पाच दिवस पाशवी बलात्कार केला. या दरम्यान त्याने तिला बेदम मारहाणही केली. मयूर गोविंद बसवंते (वय ३४) असे आरोपीचे नाव आहे. तो पांढराबोडीत माता मंदिराच्या बाजूला राहतो.
तक्रार करणारी तरुणी (वय २३) आरोपीची जुनी मैत्रीण आहे. ती पूर्वी त्याच्यासोबतच राहायची. आरोपी बसवंतेला हत्येच्या प्रयत्नात अटक झाली. त्याला कारागृहात डांबले गेले. त्याची गुन्हेगारी वृत्ती लक्षात आल्यामुळे तरुणी त्याच्यापासून दूर झाली. कारागृहातून बाहेर आल्यानंतर त्याने तिची शोधाशोध केली. ती ‘दुसरीकडे राहत’ असल्याचे कळले. त्याने तिच्याशी संपर्क करून तिला सोबत राहण्याचा आग्रह धरला. ती मानली नाही. त्यामुळे त्याने तिला मारहाणही केली. ती बधत नसल्याचे पाहून त्याने तिला चर्चा करण्याच्या बहाण्याने १७ आॅक्टोबरला घरी बोलवले. दुपारी ३ वाजता ती घरी आली. त्याने तिला पुन्हा सोबत राहण्याचा आग्रह धरला. तिने नकार देताच आरोपीने तिला बेदम मारहाण केली. तिच्यावर पाशवी बलात्कारही केला. त्यानंतर तिला घरात डांबून ठेवले. तो बाहेर जाताना घराचे दार लावून जायचा. पळून गेल्यास तोंडावर अ‍ॅसिड फेकून, ठार मारण्याची धमकी देत होता. तब्बल ५ दिवस त्याने तिला डांबून ठेवून मारहाण करीत तिच्यावर वारंवार पाशवी बलात्कार केला. दसऱ्याचा दिवस असल्यामुळे गुरुवारी त्याने आपले दार उघडे ठेवले. ती संधी साधून तरुणी बाहेर पडली आणि तिने सरळ अंबाझरी ठाणे गाठले. पोलिसांनी आरोपी बसवंतेविरुद्ध विविध कलमानुसार गुन्हे दाखल केले. आरोपीचा शोध घेतला जात आहे.

Web Title: Rape of stranded friend