नातेवाईकानेच केला बलात्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 9, 2021 04:09 IST2021-03-09T04:09:49+5:302021-03-09T04:09:49+5:30

मुलगी अनेक दिवसांपासून तिच्या आत्याच्या (आरोपीच्या) घरी राहत होती. संधी साधून त्याने २२ मार्च ते १ ऑगस्ट २०२० यादरम्यान ...

Rape by a relative | नातेवाईकानेच केला बलात्कार

नातेवाईकानेच केला बलात्कार

मुलगी अनेक दिवसांपासून तिच्या आत्याच्या (आरोपीच्या) घरी राहत होती. संधी साधून त्याने २२ मार्च ते १ ऑगस्ट २०२० यादरम्यान वारंवार बलात्कार केल्याचे मुलीने तक्रारीत म्हटले आहे. तिच्या तक्रारीवरून ठाणेदार अशोक मेश्राम यांनी रविवारी रात्री गुन्हा दाखल करून आरोपी अजहरला सोमवारी या गुन्ह्यात अटक केली. पुढील तपास सुरू आहे.

----

सासऱ्याने केला विनयभंग

नागपूर : घरची मंडळी बाहेर असताना आरोपी सासऱ्याने लज्जास्पद वर्तन केल्याची तक्रार २३ वर्षीय महिलेने जरीपटका पोलिसांकडे रविवारी नोंदवली. महिलेच्या तक्रारीनुसार, १ जुलै २०२० ते फेब्रुवारी २०२१ या कालावधीत आरोपी सासरा गुरुदीपसिंग ब्यान्स (वय ५०) याने तिचा विनयभंग केला. जरीपटका पोलिसांनी तक्रारीवरून विनयभंगाचा गुन्हा दाखल केला. पुढील तपास सुरू आहे.

---

Web Title: Rape by a relative