शेजाऱ्याचा महिलेवर बलात्कार
By Admin | Updated: October 25, 2016 02:52 IST2016-10-25T02:52:13+5:302016-10-25T02:52:13+5:30
शेजारी राहणाऱ्या एका आरोपीने विवाहित महिलेच्या (वय ३०) बाथरूममध्ये शिरून तिच्यावर पाशवी

शेजाऱ्याचा महिलेवर बलात्कार
साडीच्या पदराने बांधले हात : तोंडाला बांधला टॉवेल
नागपूर : शेजारी राहणाऱ्या एका आरोपीने विवाहित महिलेच्या (वय ३०) बाथरूममध्ये शिरून तिच्यावर पाशवी अत्याचार केला. तिने आरडाओरड अथवा प्रतिकार करू नये म्हणून आरोपीने पीडित महिलेच्या तोंडावर टॉवेल बांधला. तर, तिच्याच साडीच्या पदराने तिचे हात बांधून अत्याचार केला. रविवारी पहाटे एमआयडीसीत ही खळबळजनक घटना घडली. मात्र, बदनामीच्या धाकामुळे पीडित परिवाराने ३६ तासानंतर पोलिसांकडे तक्रार नोंदवली.
शिवकुमार विश्वकर्मा (वय ५०) असे आरोपीचे नाव आहे. तो एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीत राहतो.
३६ तासानंतर गुन्हा दाखल
४या घटनेमुळे पीडित महिलेच्या संपूर्ण परिवाराला जबर मानसिक धक्का बसला. पोलिसांकडे गेल्यास बदनामी होईल, या धाकापोटी त्यांनी दिवसभर गप्प राहणे पसंत केले. मात्र, गप्प राहिल्यास आरोपी निर्ढावेल आणि त्याच्याकडून पुन्हा असाच प्रकार घडू शकतो, हे लक्षात आल्यामुळे पीडित महिलेच्या पती आणि सासऱ्याने तिला सोमवारी दुपारी पोलीस ठाण्यात नेले. तेथे तिने नोंदविलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी सोमवारी सायंकाळी ५ च्या सुमारास शिवकुमार विश्वकर्माविरुद्ध बलात्काराचा गुन्हा दाखल केला. सहायक पोलीस निरीक्षक पी. एम. काळे यांनी रात्री ९ वाजता आरोपीला अटक केली.