विवाहित महिलेवर बलात्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 1, 2021 04:09 IST2021-03-01T04:09:26+5:302021-03-01T04:09:26+5:30

तक्रार करणारी महिला, तिचा पती आणि आरोपी प्रीत हे तिघे चांगले मित्र होते. लग्नानंतर महिलेचा पती मुंबईला खासगी कंपनीत ...

Rape of a married woman | विवाहित महिलेवर बलात्कार

विवाहित महिलेवर बलात्कार

तक्रार करणारी महिला, तिचा पती आणि आरोपी प्रीत हे तिघे चांगले मित्र होते. लग्नानंतर महिलेचा पती मुंबईला खासगी कंपनीत कामाला गेला. त्याने प्रीतला त्याच्या पत्नी-मुलावर लक्ष ठेवायला लावले. त्यातून घरी जाणे-येणे आणि महिलेसोबत जवळीक वाढली. गेल्या आठवड्यात या दोघांमधील संबंधाची माहिती कळाल्याने पतीने पत्नीकडे विचारणा केली. त्याने पती आणि मुलाला जीवे मारण्याचा धाक दाखवून २ डिसेंबर, २०२० ते २ फेब्रुवारी, २०२१ दरम्यान अनेकदा वेगवेगळ्या ठिकाणी नेऊन बलात्कार केल्याचे तिने पतीला सांगितले. त्यावरून पती पत्नीला घेऊन यशोधरानगर ठाण्यात पोहोचला. पोलिसांनी महिलेची तक्रार नोंदवून घेत, प्रीत तिरपुडेविरुद्ध बलात्कार, तसेच धमकी दिल्याच्या आरोपाखाली गुन्हा दाखल केला. शनिवारी रात्री त्याला अटक करण्यात आली. पुढील तपास सुरू आहे.

---

Web Title: Rape of a married woman