मैत्रिणीचे अपहरण करून बलात्कार
By Admin | Updated: September 21, 2015 02:50 IST2015-09-21T02:50:17+5:302015-09-21T02:50:17+5:30
१६ वर्षीय मैत्रिणीला फिरायला नेण्याच्या बहाण्याने एका निर्माणाधीन ठिकाणी नेऊन आरोपी मित्राने तिच्यासोबत तब्बल सात दिवस शरीरसंबंध प्रस्थापित केले.

मैत्रिणीचे अपहरण करून बलात्कार
सात दिवस डांबून ठेवले : एमआयडीसीतील प्रकार
नागपूर : १६ वर्षीय मैत्रिणीला फिरायला नेण्याच्या बहाण्याने एका निर्माणाधीन ठिकाणी नेऊन आरोपी मित्राने तिच्यासोबत तब्बल सात दिवस शरीरसंबंध प्रस्थापित केले. सुमित पुरी (वय १९) असे आरोपीचे नाव असून, तो बुटीबोरीच्या गोदावरी लेआऊटमध्ये राहतो.
पीडित मुलगी १६ वर्षांची आहे. ती याचवर्षी दहावी नापास झाली. आरोपी सुमित पॉलिटेक्निकच्या दुसऱ्या वर्षाला शिकतो. त्याचे वडील लेबर कॉन्टॅ्रक्टर असून, मुलीचा परिवार एमआयडीसीत राहतो. पूर्वी ती सुद्धा बुटीबोरीतच राहत होती. शेजारी असल्यामुळे या दोघांमध्ये ‘मैत्रीसंबंध’ निर्माण झाले. त्यानंतर मुलीचा परिवार बुटीबोरी सोडून एमआयडीसीत राहायला आल्याने या दोघांची ताटातूट झाली. दरम्यान, १० सप्टेंबरला रात्री १०.३० वाजता मुलगी आपल्या घरासमोर उभी होती. तेवढ्यात सुमित तेथे आला. तक्रारीनुसार जीवे मारण्याची धमकी देऊन त्याने तिला आपल्या दुचाकीवर बसवून आणि बुटीबोरीतील एका निर्माणाधीनस्थळी आला. या ठिकाणी एका खोलीत डांबून आरोपीने तिच्यासोबत तब्बल सात दिवस वारंवार शरीरसंबंध जोडले.
दरम्यान, मुलीच्या मैत्रिणींच्या माध्यमातून शोध घेणाऱ्या आईला गुरुवारी मुलगी गवसली. तिची चौकशी केली असता, ‘सुमितने बुटीबोरीतील एका घराच्या खोलीत डांबून ठेवून जबरी बलात्कार केला’,अशी माहिती तिने दिली. ती ऐकून आईने तिला सरळ बुटीबोरी ठाण्यात नेले. घटनाक्रमाची सुरुवात एमआयडीसीतून झाल्याचे ऐकताच बुटीबोरी पोलिसांनी या मायलेकींना एमआयडीसीत पाठविले. एमआयडीसीचे ठाणेदार विष्णुकांत भोये यांनी घटनाक्रम ऐकून अपहरण करून बलात्कार करणे, डांबून ठेवणे, आदी गुन्हे दाखल केले.(प्रतिनिधी)
सारेच धक्कादायक
या प्रकरणाचे अनेक धक्कादायक पैलू पोलीस चौकशीत उघड झाले आहे. पीडित मुलगी आणि आरोपींमध्ये वर्षभरापासून मैत्रीपूर्ण संबंध असल्यामुळे फिरण्याच्या नावाखाली अनेकदा बाहेर जायचे. दोन-तीन दिवस बाहेर राहायचे. अशाच प्रकारे काही दिवसांपूर्वी ते बाहेर गेले. कुठेच जागा मिळाली नाही म्हणून त्यांनी ‘भलत्याच ठिकाणी’ रात्र काढल्याचेही तपासात पुढे आल्याचे पोलीस सांगतात. मुलगी नेहमीच मैत्रिणीकडे जात असल्यामुळे याहीवेळी ती मैत्रिणीकडेच असावी, असे समजून कुटुंबीयांनी फारसे मनावर घेतले नाही. मात्र तब्बल सात दिवस होऊनही तिचा ठावठिकाणा लागत नसल्याने चिंताग्रस्त आईने तिची शोधाशोध सुरू केली अन् हे प्रकरण उजेडात आले.