निराधार युवतीवर बलात्कार

By Admin | Updated: October 28, 2015 03:02 IST2015-10-28T03:02:55+5:302015-10-28T03:02:55+5:30

निराधार दलित युवतीला लग्नाचे आमिष दाखवून तिचे दोन वर्षांपासून लैंगिक शोषण करणाऱ्या आरोपीविरुद्ध प्रतापनगर पोलिसांनी गुन्हा दाखल केला.

Rape on a helpless maiden | निराधार युवतीवर बलात्कार

निराधार युवतीवर बलात्कार

नागपूर : निराधार दलित युवतीला लग्नाचे आमिष दाखवून तिचे दोन वर्षांपासून लैंगिक शोषण करणाऱ्या आरोपीविरुद्ध प्रतापनगर पोलिसांनी गुन्हा दाखल केला.आशिष जांगोजी दाभेकर (वय २७) असे आरोपीचे नाव आहे. तो रामनगर, हनुमान मंदिर जवळ, राहतो. पीडित मुलगी निराधार आहे. मैत्रिणीच्या माध्यमातून दोन वर्षांपूर्वी ती आरोपी दाभेकरच्या संपर्कात आली. प्रेमसंबंधानंतर त्याने तिला लग्नाचे आमिष दाखवले. त्यानंतर त्याने दोन वर्षांपासून लग्नाचे आमिष दाखवून तिच्याशी वेगवेगळ्या ठिकाणी जबरी शरीरसंबंध प्रस्थापित केले. अलीकडे तिने लग्नाचा विषय काढताच तो तिला लाथाबुक्कीने मारहाण करू लागला. जीवे मारण्याचीही धमकी देऊ लागला.
तो लग्न करणार नाही, याची खात्री पटल्यामुळे पीडित मुलीने प्रतापनगर ठाण्यात तक्रार नोंदवली.
पीएसआय शेख यांनी आरोपीविरुध्द बलात्कार तसेच अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा नोंदविला.(प्रतिनिधी)

Web Title: Rape on a helpless maiden