लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : ब्रायलर फार्मच्या मालकाला २० लाखांची खंडणी मागणाऱ्या गुंडांविरुद्ध हुडकेश्वर पोलिसांनी गुन्हा दाखल केला. दानिश हाजी, अशपाक आणि त्यांच्या चार साथीदारांचा या गुन्ह्यात सहभाग आहे.मोहम्मद निसार भाटी अब्दुल शकूर (वय ४१) हे शांतिनगरात राहतात. शुक्रवारी सायंकाळी ६ च्या सुमारास ते त्यांच्या हुडकेश्वरमधील बेसा पॉवर हाऊसजवळच्या ताज ब्रायलर फार्म हाऊसमध्ये हजर असताना आरोपी दानिश, अशपाक आणि त्यांचे चार साथीदार तेथे आले. त्यांनी निसार यांना शिवीगाळ केली. तू माझा फोन का उचलत नाही, असे विचारत आरोपी दानिशने २० लाखांची खंडणी मागितली. रक्कम दिली नाही तर जीवे ठार मारू, अशी धमकीही दिली. फिर्यादीने दिलेल्या तक्रारीवरून हुडकेश्वर पोलिसांनी उपरोक्त सहा आरोपींविरुद्ध विविध कलमानुसार गुन्हा दाखल केला. त्यांचा शोध घेतला जात आहे.
२० लाखांची खंडणी मागितली : ब्रायलर फार्मच्या मालकाला धमकी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 3, 2019 00:49 IST
ब्रायलर फार्मच्या मालकाला २० लाखांची खंडणी मागणाऱ्या गुंडांविरुद्ध हुडकेश्वर पोलिसांनी गुन्हा दाखल केला. दानिश हाजी, अशपाक आणि त्यांच्या चार साथीदारांचा या गुन्ह्यात सहभाग आहे.
२० लाखांची खंडणी मागितली : ब्रायलर फार्मच्या मालकाला धमकी
ठळक मुद्देहुडकेश्वर पोलिसांत गुन्हा दाखल