शहरं
Join us  
Trending Stories
1
'कसाब नाही, हेमंत करकरेंवर पोलिसांनी गोळ्या घाडल्या', विजय वडेट्टीवारांचा खळबळजनक दावा
2
राहुल आणि सिद्धरामय्या यांचा कार्टून व्हिडिओ; काँग्रेसची जेपी नड्डांसह तीन BJP नेत्यांविरुद्ध तक्रार
3
अजितदादांचे पुत्र जय पवारांनी घेतली मनोज जरांगेंची भेट; कारण गुलदस्त्यात, चर्चांना उधाण
4
'राणेंचा प्रचार करायला लागतोय यातच राज ठाकरेंचा विजय'; काँग्रेस नेत्याची बोचरी टीका
5
४ जूननंतर अजित पवार मिशी काढून फिरतील; आव्हानावर श्रीनिवास पवारांचे जोरदार प्रत्त्यूत्तर
6
मौनी खासदाराचं कौतुक करणं मनसे प्रमुखांची मजबुरी, संजय राऊतांचा राज ठाकरेंवर निशाणा
7
PHOTOS: अभिनेत्रींना मात देणारी 'अधिकारी'! राजकारणात आवड, चित्रपटांची ऑफर पण...
8
धक्कादायक! कोविड सारख्या 'या' गंभीर आजारामुळे हजारो 'श्वान' मरणाच्या दारात!
9
बजरंग पूनियावर NADAची मोठी कारवाई, पॅरिस ऑलिम्पिकमध्ये खेळण्याचं स्वप्न भंगणार?
10
“छत्रपती शिवरायांचा अनादर करणारा नेता नको”; पीयूष गोयल यांची राहुल गांधींवर टीका
11
ऑस्ट्रेलियातील महिला खासदाराचा लैंगिक छळ; पोस्ट करत मांडली व्यथा, म्हणाल्या...
12
राहुल गांधी, सिद्धरामय्या यांच्या ॲनिमेटेड व्हिडिओवरून वाद; जेपी नड्डा, अमित मालवीय यांच्याविरोधात काँग्रेसची तक्रार
13
'राजकारणातील कुठलीही ताकद...'; अमेठीतून तिकीट न मिळाल्याने रॉबर्ट वाड्रांची भावनिक पोस्ट
14
निज्जर हत्येप्रकरणी ३ भारतीयांना झालेल्या अटकेबाबत भारताची पहिली प्रतिक्रिया, जयशंकर म्हणाले...
15
"मुलांशी बोलू नकोस", भावाचा सल्ला अन् बहीण संतापली; १४ वर्षीय तरूणीने केली हत्या
16
अभिनेते क्षितीज झारापकर यांचे निधन, ५४व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
17
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना लाभ, व्यापाऱ्यांवर लक्ष्मीकृपा; बचत वाढेल, इच्छा पूर्ण होतील
18
करिअरच्या उच्च शिखरावर असताना सोडलं बॉलिवूड; लारा दत्ता म्हणाली, 'वाढत्या वयासोबत...'
19
नुपूर शर्मा, टी राजा यांच्यासह हिंदू नेत्यांच्या हत्येचा कट रचणाऱ्या मौलवीला अटक; १ कोटींची सुपारी अन् पाककडून शस्त्रे 
20
'तेजस्वी सूर्या गुंडगिरी करतात, मासे खातात'; काँग्रेसवर टीका करताना कंगनाने भाजप नेत्याला केलं लक्ष!

रणजी ट्रॉफी; वडिलांची सेवा करणारा आदित्य ठरला 'रणजी'चा राजा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 08, 2019 11:51 AM

रणजी करंडकाच्या अंतिम सामन्यात चेतेश्वर पुजाराला दोन्ही डावांत बाद करीत लक्ष वेधणाऱ्या आदित्यने सामन्यात ११ बळी घेत सामनावीराचा मानही मिळविला.

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : आयुष्यात अडचणीच्यावेळी अनेक संकटे उभी राहतात. या संकटांचा सामना करता-करता आशाआकांक्षेवर पाणी फेरण्याचीही अनेकांवर वेळ येते पण संकटांचा धैर्याने सामना करीत वाटचाल करणाऱ्यांना ‘जिगरबाज’ मानले जाते. आलेल्या प्रत्येक दिवसाला सामोरे जात न डगमगता संयमीवृत्तीतून यशाचा मार्ग शोधणारा आदित्य सरवटे त्यातलाच एक खेळाडू.रणजी करंडकाच्या अंतिम सामन्यात चेतेश्वर पुजाराला दोन्ही डावांत बाद करीत लक्ष वेधणाऱ्या आदित्यने सामन्यात ११ बळी घेत सामनावीराचा मानही मिळविला. या यशामागील आदित्यचे परिश्रम आहेतच शिवाय परिस्थितीने घेतलेल्या परीक्षेत तो कसा उत्तीर्ण झाला, याची प्रेरणादेखील आहे.वडील २० वर्षांपासून अंथरुणाला खिळून असताना आईने घर चालविण्याची जबाबदारी स्वीकारली. आदित्यचे वडील आनंद हे २० वर्षांआधी भावाला भेटायला मुंबईला गेले असताना त्यांच्या वाहनाला टँकरने धडक दिल्यामुळे ते कोमात गेले. कोमातून काही दिवसांनी ते बाहेर आले तेव्हा त्यांना अर्धांगवायू जडला. तेव्हापासून ते अंथरुणावर आहेत. आई अनुश्री बँकेत कामाला आहेत. त्या कामावर जातात तेव्हा वडिलांना आंघोळ घालण्यापासून जेवण भरविण्यापर्यंतची काळजी आदित्यच घेतो.लहानपणापासून आदित्यच्या नाजूक खांद्यावर अनेक जबाबदाऱ्या आल्या तरी तो डगमगला नाही. क्रिकेटसोबतच तो अभ्यासातही हुशार आहे. पदवीपर्यंतचे शिक्षण घेतल्यानंतर त्याने फायनान्शियल मॅनेजमेंटची पदविका घेतली. त्यातही तो ‘टॉपर’ होता. पुढे आईवर असलेला घरचा आर्थिक भार कमी करण्यासाठी आदित्यने नागपूरच्या एजी कार्यालयात नोकरी पत्करली. २१ वर्षांचा आदित्य केवळ गोलंदाज नाही तर चांगला फलंदाज आणि क्षेत्ररक्षकदेखील आहे. रणजीत चमक दाखविताच त्याच्या नावाची अनेकांना ओळख झाली. त्याचे स्वप्न लहानसे नाही. यंदा एकाच मोसमात सर्वाधिक ५५ गडी बाद करीत या डावखुºया गोलंदाजाने जामठ्याच्या व्हीसीए स्टेडियमवर उपस्थित मुख्य निवडकर्ते एमएसके प्रसाद यांना दखल घेण्यास भाग पाडले असावे. राष्ट्रीय संघासाठी आपल्याही नावाचा विचार व्हावा, इतकी दावेदारी आदित्यने नक्कीच सादर केली आहे.

टॅग्स :Ranji Trophyरणजी करंडक