शहरं
Join us  
Trending Stories
1
'ठाकरे बंधूंचा वचननामा ४ जानेवारीला प्रसिद्ध करणार, नंतर एवढ्या संयुक्त सभा होणार', संजय राऊत यांनी दिली माहिती 
2
'AB फॉर्म'चा झोल केला! भाजपच्या बंडखोर उमेदवाराने पक्षालाच गंडवलं, अमित साटमांचे थेट अधिकाऱ्यालाच पत्र
3
सिगरेट, पान मसाला, तंबाखू महागणार, नवीन कर आणि सेस लागू होणार; १ फेब्रुवारीपासून किंमत वाढणार? जाणून घ्या
4
आजपासून 'भारत टॅक्सी'ची सुरुवात; स्वस्त प्रवास अन् 'नो सर्ज प्रायसिंग'ने प्रवाशांना मिळणार दिलासा
5
दोन वर्षांत १४ लाख पाकिस्तान्यांनी देश सोडला! कारण काय?
6
१ वर्षासाठी एफडीमध्ये १ लाख रुपये गुंतवून तुम्हाला किती परतावा मिळेल? कोणत्या बँकेत किती रिटर्न, पाहा
7
ईडीने धनकुबेराच्या घरीच छापा मारला; रोकड सोडा, दागिनेच एवढ्या कोटींचे सापडले की... घबाड पाहून अधिकारीही अवाक्
8
दूधात मिसळलं नळाचं पाणी, तेच ठरलं विष; ५ महिन्यांच्या अव्यानचा मृत्यू, १० वर्षांनी झालेला मुलगा
9
नवे वर्ष २०२६: आयुष्यातील नकारात्मकता दूर करण्यासाठी या वर्षात करा 'हे' ५ उपाय!
10
मुंबईकरांना वीज, पाणी, शिक्षण, आरोग्य सेवा मोफत; ‘आप’ने दिली गॅरंटी, जाहीरनामा केला प्रसिद्ध
11
"भाजपच्या सांगण्यावरुनच कृपाशंकर यांनी..."; उत्तर भारतीय महापौर करण्याच्या विधानावरुन संजय राऊत आक्रमक
12
Success Story: कपडे धुवून कोट्यधीश बनली 'ही' व्यक्ती, एकेकाळी रिक्षाचं भाडं देण्यासही नव्हते पैसे, कसा होता आजवरचा प्रवास
13
शिंदेसेनेच्या २, उद्धवसेना, काँग्रेसच्या प्रत्येकी एका उमेदवाराचा अर्ज रद्द, ७१९ उमेदवार रिंगणात
14
विमानाचं तिकीट आता खिशाला परवडणार? विमान इंधनाच्या किमतीत मोठी कपात; पाहा काय आहेत नवीन दर?
15
तो काळ परत येणार नाही...! PCO चा बुथ ते 3G डोंगलचा वेग; स्मार्टफोन आणि ५जीच्या स्पीडने तुम्ही विसरलात का...?
16
प्रवाशांनो… २४ ट्रेनची वेळ बदलली, ६२ ट्रेनचा वेग वाढला; पुणे, मुंबईतील अनेक ट्रेनचा समावेश!
17
अर्ज छाननीचाही ‘रात्रीस खेळ चाले’; मुंबईत १६७ अर्ज बाद, भाईंदरमध्ये ६०० अर्ज वैध
18
'धुरंधर'च्या यशानंतरही रणवीर सिंह गायब? आता दिली पहिली प्रतिक्रिया; म्हणाला, 'पाजी खूप...'
19
बंडखोरी, नाराजी शमविण्यासाठी ठाकरे बंधूंचे नेते आता मैदानात
20
LPG Price Hike: नववर्षाच्या पहिल्याच दिवशी महागाईचा झटका, एलपीजी सिलेंडरच्या दरात मोठी वाढ
Daily Top 2Weekly Top 5

भारतीय बनावटीच्या पिचकाऱ्यांनी रंगोत्सव : नागपुरात पाच कोटींची उलाढाल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 11, 2020 20:14 IST

यावर्षी होळीत नागपुरात ठोक बाजारात भारतीय बनावटीच्या पिचकाऱ्यांची जवळपास पाच कोटींची विक्री झाली. यंदा लोकांनी भारतीय बनावटीच्या पिचकाऱ्यांनी रंगोत्सव साजरा केला.

ठळक मुद्दे चीनमधून आयात बंद

लोकमत  न्यूज  नेटवर्कनागपूर : केंद्र सरकारने तीन वर्षांपूर्वी चीनची खेळणी आणि पिचकाऱ्यांवर जास्त अबकारी शुल्क आकारल्याने आयात कमी झाली आहे. शिवाय यावर्षी कोरोना विषाणूमुळे आयात जवळपास बंद झाली. त्यामुळे भारतात या उद्योगात पुन्हा सुगीचे दिवस आले आहेत. यावर्षी होळीत नागपुरात ठोक बाजारात भारतीय बनावटीच्या पिचकाऱ्यांची जवळपास पाच कोटींची विक्री झाली. यंदा लोकांनी भारतीय बनावटीच्या पिचकाऱ्यांनी रंगोत्सव साजरा केला.केंद्र सरकारने कस्टम पॉलिसी लागू करण्याआधी देशातील बाजारपेठांमध्ये भारतीय बनावटीच्या ४० टक्के आणि ६० टक्के चिनी खेळणी आणि पिचकाऱ्यांची विक्री व्हायची. पण गेल्या वर्षीपर्यंत भारतीय बनावटीच्या मालांनी ७० टक्के बाजारपेठ काबीज केली. यावर्षी ९५ टक्के भारतीय मालाची विक्री झाली. तीन महिन्यांपूर्वी काही विक्रेत्यांनी चीनमधून मागविलेल्या ५ टक्के पिचकाऱ्यांची विक्री झाल्याची माहिती इतवारी जनरल मर्चंट असोसिएशनचे माजी अध्यक्ष अशोक सिंघवी यांनी दिली.दरवर्षी नवीन पिचकारी खरेदीची भारतीय लोकांची मानसिकता असल्याने यंदाही लोकांनी उत्साहात खरेदी केली. जास्त किमतीच्या कॅप्सूल आणि टॅन्कला जास्त मागणी होती. सिंघवी म्हणाले, भारतीय बनावटीची खेळणी आणि पिचकाऱ्यांची मागणी देशांतर्गत वाढल्याने दिल्ली, गुडगाव, मुंबई येथील उत्पादकांनी मालाच्या दर्जात सुधारणा केली. स्पर्धा होऊ लागल्याने चिनी मालाच्या किमतीतच भारतीय माल ग्राहकांना मिळू लागला. केंद्र सरकारच्या धोरणामुळे चीनमधून या मालाची आयात करणे कठीण झाले. त्यामुळे देशांतर्गत उद्योग वाढले असून, रोजगारातही वाढ झाली आहे.रिटेल व्यवसायावर थोडा फार परिणामयावर्षी कोरोना व्हायरसचा परिणाम ठोक व्यवसायाऐवजी रिटेल व्यवसायावर झाला. होळीचा व्यवसाय दोन महिन्यांपूर्वी सुरू होतो. ठोक विक्रेते होळीसाठी लागणाऱ्या वस्तूंचा संग्रह करतात. अनेकांनी दोन महिन्यांपूर्वीच पिचकाऱ्या आणि अन्य वस्तू मागविणे सुरू केले. त्यानुसार रिटेल व्यावसायिकांनीही होळीच्या १५ दिवसांपूर्वी मालाची खरेदी केली. पण दोन-चार दिवसांपूर्वी होळी सण एकत्रितरीत्या साजरा करण्यावर निर्बंध आल्याने रिटेलमधून पिचकाऱ्यांची विक्री कमी झाली. त्याचा परिणाम होळीच्या व्यवसायावर झाल्याचे सिंघवी म्हणाले.

टॅग्स :Holiहोळीbusinessव्यवसाय