नागपुरातील ॲग्रोव्हिजन राष्ट्रीय कृषी प्रदर्शनातील पाहणी दौरा अर्धवट सोडून राणे मुंबईकडे रवाना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 27, 2021 20:30 IST2021-12-27T20:30:16+5:302021-12-27T20:30:48+5:30
Nagpur News नागपुरात सुरू असलेल्या ॲग्रोव्हिजन राष्ट्रीय कृषी प्रदर्शनाला भेट देण्यासाठी आलेले केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी आज दुपारी अचानक प्रदर्शन पाहताना मुंबईला जाण्याचा निर्णय घेतला व ते रवाना झाले.

नागपुरातील ॲग्रोव्हिजन राष्ट्रीय कृषी प्रदर्शनातील पाहणी दौरा अर्धवट सोडून राणे मुंबईकडे रवाना
नागपूरः नागपुरात सुरू असलेल्या ॲग्रोव्हिजन राष्ट्रीय कृषी प्रदर्शनाला भेट देण्यासाठी आलेले केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी आज दुपारी अचानक प्रदर्शन पाहताना मुंबईला जाण्याचा निर्णय घेतला व ते रवाना झाले.
या प्रदर्शनात आज मंगळवारी ते प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित झाले होते. यासाठी त्यांचे सकाळी नागपुरात आगमन झाले. दुपारी रेशिमबागेतील प्रदर्शनस्थळी येऊन त्यांनी येथील स्टॉल्सची पाहणीही सुरू केली. मात्र अचानक ही पाहणी अर्धवट सोडून ते तातडीने मुंबईला रवाना झाले.
त्यामुळे त्यांच्या उपस्थितीविनाच या प्रदर्शनाचा समारोपाचा कार्यक्रम पार पडला. त्यांच्या अशा अचानक जाण्याची मात्र उपस्थितांमध्ये बरीच चर्चा झाली.