शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपतीपदाच्या निडणुकीचा कार्यक्रम जाहीर, ९ सप्टेंबरला होणार मतदान, निवडणूक आयोगाची घोषणा, असा आहे संपूर्ण कार्यक्रम
2
ट्रम्प यांच्या टॅरिफ वॉर दरम्यान भारताचा मोठा निर्णय; अमेरिकेकडून 'एफ ३५' जेट खरेदी करणार नाही!
3
"मोहन भागवत यांना पकडण्याचे आदेश होते"; मालेगाव स्फोट प्रकरणी माजी ATS अधिकाऱ्याचा दावा
4
सॅमसंगचे स्मार्ट टीव्ही बंद पडले, ग्राहक ठणाठणा ओरडू लागले; सर्व्हर डाऊनचे मेसेज दिसू लागले...
5
Pune Crime: कोयता काढला अन् सपासप वार करत सुटला; बारामती-इंदापूर धावत्या बसमध्ये प्रवाशावर हल्ला
6
बँकेत नोकरीची सुवर्णसंधी; IPBS ची १०,२७७ पदांवर मेगाभरती, महाराष्ट्रासाठी किती जागा?
7
आता PF काढणं झालं एकदम सोपं! फक्त 'हे' काम करा आणि कागदपत्रांशिवाय काही दिवसांत पैसे मिळवा!
8
ऑगस्ट २०२५ पासून बँकिंग आणि पैशांशी निगडीत नियमांत बदल; तुमच्यासाठी जाणून घेणं अतिशय महत्त्वाचं
9
पत्नीने पतीला नपुंसक म्हणणं गुन्हा आहे?; मुंबई हायकोर्टानं दिला महत्त्वाचा निर्णय
10
मुंबई आणि मालेगाव बॉम्बस्फोटात दुटप्पी राजकारण; केशव उपाध्ये यांचा काँग्रेसवर हल्लाबोल
11
अमेरिका एवढ्या खालच्या पातळीवर जाईल असे...; केव्हा केव्हा भारताविरोधात कारस्थाने रचलेली...
12
"मला कोंडून ठेवलं, पत्नीला दुखापत..."; आमदार चेतन आनंद यांचे एम्स कर्मचाऱ्यांवर गंभीर आरोप
13
जावई पहिल्यांदा सासरवाडीत आला, सासुने मस्त चिकनचा बेत आखला; विषबाधेमुळे दोघांचाही मृत्यू
14
प्रेमाचा त्रिकोण! आमच्या दोघींपैकी एकीला निवड; गर्लफ्रेंडच्या सांगण्यावरून पतीने केला मोठा कांड
15
२४ घरं, ४ प्लॉट, ४० एकर शेतजमीन... १५ हजार पगार असलेल्या क्लार्ककडे ३० कोटींचं घबाड
16
एकमेकांना शेवटचं बघताच आलं नाही! अल्जेरियात मुलाचा मृत्यू, मृतदेहाची वाट पाहणाऱ्या वडिलांचेही निधन 
17
एन चंद्रशेखरन यांच्या हाती पुन्हा टाटा सन्सची धुरा; IPO ची वाट पाहणाऱ्यांना पुन्हा एकदा मोठा झटका
18
वडिलांचा मृत्यू, बॉयफ्रेंडसोबत पळाली आई; लेकाची पोलिसांत धाव, म्हणाला, "ते मला मारुन टाकतील..."
19
नोकरी सुरू होताच १५,००० रुपये तुमच्या खात्यात! मोदी सरकारने आणली 'ही' खास योजना, कंपनीलाही मिळेल फायदा!

विदर्भाच्या ‘रॅन्चो’ने केली ‘न्यूटन’,‘आईनस्टाईन’ची बरोबरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 30, 2018 21:04 IST

एरवी अभियांत्रिकीचे शिक्षण घेतल्यानंतर विद्यार्थ्यांना गलेलठ्ठ ‘पॅकेज’ची ओढ असते आणि त्यासाठीच ते झटत असतात. मात्र समाजाचे आपण काहीतरी देणे लागतो या विचारातून यवतमाळ जिल्ह्यातील लहानशा गावातून आलेल्या एका तरुणाने विद्यार्थीजीवनातच आपल्या आयुष्याची दिशा ठरवली अन् स्वत:मधील संशोधक घडविण्यावर भर दिला. इतर सहकारी स्थिरस्थावर होण्यासाठी फिरत असताना या गड्याच्या नावावर वयाच्या अवघ्या २७ व्या वर्षी १८ ‘पेटंट’ची नोंदणी आहे. विशेष म्हणजे एकाच दिवशी चार ‘पेटंट’ची स्वत:च्या नावे नोंदणी करुन त्याने विज्ञान जगतातील भीष्माचार्य सर आयझॅक न्यूटन व अल्बर्ट आईनस्टाईन यांच्या विक्रमांशी बरोबरी केली. अजिंक्य रवींद्र कोत्तावार या अवघ्या २७ वर्ष वयाच्या या तरुणाने आपल्या कर्तृत्वाने भल्याभल्यांना अचंबित केले आहे.

ठळक मुद्देएकाच दिवसात मिळविले चार ‘पेटंट’ : समाजहित डोळ्यासमोर ठेवून करतोय संशोधन

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : एरवी अभियांत्रिकीचे शिक्षण घेतल्यानंतर विद्यार्थ्यांना गलेलठ्ठ ‘पॅकेज’ची ओढ असते आणि त्यासाठीच ते झटत असतात. मात्र समाजाचे आपण काहीतरी देणे लागतो या विचारातून यवतमाळ जिल्ह्यातील लहानशा गावातून आलेल्या एका तरुणाने विद्यार्थीजीवनातच आपल्या आयुष्याची दिशा ठरवली अन् स्वत:मधील संशोधक घडविण्यावर भर दिला. इतर सहकारी स्थिरस्थावर होण्यासाठी फिरत असताना या गड्याच्या नावावर वयाच्या अवघ्या २७ व्या वर्षी १८ ‘पेटंट’ची नोंदणी आहे. विशेष म्हणजे एकाच दिवशी चार ‘पेटंट’ची स्वत:च्या नावे नोंदणी करुन त्याने विज्ञान जगतातील भीष्माचार्य सर आयझॅक न्यूटन व अल्बर्ट आईनस्टाईन यांच्या विक्रमांशी बरोबरी केली. अजिंक्य रवींद्र कोत्तावार या अवघ्या २७ वर्ष वयाच्या या तरुणाने आपल्या कर्तृत्वाने भल्याभल्यांना अचंबित केले आहे.यवतमाळ जिल्ह्यातील पाटणबोरी येथे अजिंक्यने शालेय शिक्षण घेतले. त्यानंतर त्याने यवतमाळच्या जवाहरलाल दर्डा अभियांत्रिकी महाविद्यालयातून ‘मेकॅनिकल’ अभियांत्रिकीमध्ये पदवी प्राप्त केली. शालेय जीवनापासूनच विविध प्रयोगांची त्याला आवड होती अन् स्वत:मधील वेगळेपण सिद्ध करण्याची प्रेरणा शिक्षिका असलेल्या आई क्षमा व वडील रवींद्र यांनी दिली. वाहनाची कार्यक्षमता वाढविणारे इंजिन, सिल्चर येथील ‘एनआयटी’त एका प्रकल्पासाठी गेलेल्या अजिंक्यने चहाच्या झाडाच्या पानांपासून तयार केलेले ‘बायोडिझेल’, ‘बायोमेट्रीक व्होटिंग सिस्टीम’, ‘मल्टीफ्युएल इंजिन’, ‘इकोफ्रेंडली हिटिंग अ‍ॅन्ड कुलिंग सिस्टीम’, ‘रिन्युवेबल बॅटरी पॉवर चार्जर’, ‘वॉटर प्युरिफिकेशन बॉटल’ इत्यादी विविधांगी संशोधन केले. विशेष म्हणजे त्याने ‘मेकॅनिकल’ अभियांत्रिकीसोबतच रसायनशास्त्र, भौतिकशास्त्र, कृषी, यांच्यासह विविध अभ्यासक्रमांचा अभ्यास करुन संशोधन करण्यावर भर दिला.अल्बर्ट आईनस्टाईन व सर आयझॅक न्यूटन यांच्या नावावर एकाच दिवशी चार ‘पेटंट’ची नोंदणी झाल्याचा विक्रम होता. अजिंक्यने एकाच दिवशी चार ‘पेटंट’ची नोंदणी करत या विक्रमाची बरोबरी केली. सोबतच वैज्ञानिक भाषेत २५ वर्ष हे अपरिपक्व वय समजण्यात येते. या वयात न्यूटनच्या नावावर १५ ‘पेटंटस’ होते तर अजिंक्यच्या नावावर १२ ची नोंदणी होती.तयार केला विज्ञानाधिष्ठित अभ्यासक्रमअजिंक्य केवळ संशोधकच नाही तर त्याच्यात एक उत्तम शिक्षकदेखील दडला आहे. कर्नाटक येथे एका विद्यापीठात तो गेला असता त्याने तेथील अभियांत्रिकी विद्यार्थ्यांसाठी विज्ञानाधिष्ठित अभ्यासक्रम सुरू केला होता. शालेय व महाविद्यालयीन अभ्यासक्रमांमध्ये प्रात्यक्षिकांवर हवा तसा भर देण्यात येत नाही ही खंत त्याला सलायची. अखेर त्याने स्वत: ‘ज्ञान फाऊंडेशन’ या संस्थेची स्थापना केली व शालेय विद्यार्थ्यांच्या अभ्यासक्रमाशी सुसंगत असा प्रात्यक्षिकांवर आधारित नवा अभ्यासक्रमच तयार केला. विद्यार्थी प्रात्यक्षिकातून धडे गिरवतील अशी विविध ५०० मॉडेल्स त्याने तयार केली आहेत. राज्यातील सुमारे २० हजार विद्यार्थ्यांना या माध्यमातून त्याने मार्गदर्शन केले असल्याचा त्याने दावा केला आहे. महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी विशाल लिचडे यांच्या सहकार्याने ‘प्रोजेक्ट ग्रोथ’ हा प्रकल्प राबविण्यात येणार असल्याचे त्याने सांगितले.‘सोनम वांगचूक’कडून मार्गदर्शनगेल्या अनेक वर्षांपासून प्रयोगांवर आधारित अभ्यासक्रम राबविणारे व मॅगसेसे पुरस्कार विजेते संशोधक ‘सोनम वांगचूक’ यांनीदेखील अजिंक्यच्या कामाचे कौतुक केले. ‘ज्ञान फाऊंडेशन’ला वांगचूक यांचे मार्गदर्शन मिळत असून डॉ.विजय भटकर, डॉ.प्रकाश आमटे, अविनाश सावजी हेदेखील जुळले आहेत.संशोधनाचा उपयोग जनतेला व्हावागलेलठ्ठ पगाराच्या अनेक ‘आॅफर्स’ माझ्याकडे अगोदरपासून होत्या. मात्र माझे ‘व्हिजन’ स्पष्ट होते. शिवाय मी जवळून लोकांच्या समस्या पाहिल्या आहेत. संशोधनाचा उपयोग जनतेला व्हावा यावर माझा भर राहणार आहे.

टॅग्स :scienceविज्ञानVidarbhaविदर्भ