शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
3
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
4
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
5
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
6
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
7
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
8
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
9
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
10
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
11
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
12
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
13
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
14
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
15
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
16
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
17
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
18
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
19
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
20
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
Daily Top 2Weekly Top 5

नागपुरातील रामझुल्याचा १८ वर्षांचा वनवास संपला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 16, 2019 21:05 IST

रेल्वे स्थानकाजवळील जयस्तंभ चौक ते पोद्दारेश्वर राममंदिरापर्यंत जोडणाऱ्या बहुप्रतिक्षित रामझुल्याचा दोन वर्षापूर्वी एक टप्पा वाहतुकीसाठी खुला करण्यात आला होता. दुसऱ्या टप्प्याचे काम पूर्ण झाले आहे. हा मार्ग वाहतुकीसाठी शुक्रवारी खुला केला जाणार आहे. या सोबतच रामझुल्याचा १८ वर्षाचा वनवास संपणार आहे.

ठळक मुद्देशुक्रवारी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन : ५१७. ३६ कोटींचा प्रकल्प

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : रेल्वे स्थानकाजवळील जयस्तंभ चौक ते पोद्दारेश्वर राममंदिरापर्यंत जोडणाऱ्या बहुप्रतिक्षित रामझुल्याचा दोन वर्षापूर्वी एक टप्पा वाहतुकीसाठी खुला करण्यात आला होता. दुसऱ्या टप्प्याचे काम पूर्ण झाले आहे. हा मार्ग वाहतुकीसाठी शुक्रवारी खुला केला जाणार आहे. या सोबतच रामझुल्याचा १८ वर्षाचा वनवास संपणार आहे.जयस्तंभ चौक ते पोद्दारेश्वर राममंदिर हा अतीवर्दळीचा मार्ग असून या मार्गावर नेहमीच वाहनाची गर्दी असते. रामझुल्याच्या दोन्ही बाजूची वाहतूक एकाच भागातून होत असल्याने अडथळा निर्माण होत होता. परिणामी या मार्गावर अपघाताचे प्रमाण वाढले आहे. वाहन चालकांना बराच त्रास सहन करावा लागत असल्याने दुसऱ्या टप्प्याचे काम पूर्ण होऊ न वाहतुकीसाठी कधी खुला होईल याची लोकांना प्रतीक्षा होती. रामझुल्यामुळे जयस्तंभ चौकातील वाहतुकीची कोंडी फुटणार आहे.रामझुलाचे कार्यादेश २५ जानेवारी २००६ ला देण्यात आले होते. पहिला टप्पा सुरू होण्यास आठ वर्षे लागली तर दुसरा टप्पा चार वर्षांत पूर्ण झाला. रामझुलासाठी थेट जपानवरून केबल मागवण्यात आले आहेत. या प्रकल्पाची आखणी वर्धनक्षम होण्याच्या दृष्टीने नागपूर महापालिका, नासुप्र नगरविकास विभाग, विदर्भ वैधानिक विकास मंडळ, जिल्हा नियोजन समिती तसेच आमदार निधीतून सहभाग निश्चित करण्यात आला होता. त्यानुसार ४३२ कोटींचा निधी उभारला जाणार होता. मात्र प्रत्यक्षात २९५.६६ कोटींचा सहभाग प्राप्त झाला. उर्वरित १३६ .३३ कोटी अद्याप महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाला मिळालेले नाहीत. शुक्रवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याहस्ते दुपारी १ वाजता रामझुला टप्पा २ चे उद्घाटन होत आहे. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी राहतील.उच्च न्यायालयाच्या निर्देशाने मिळाली गतीरखडलेल्या रामझुला उड्डाणपुलाबाबत नागपूर चेंबर ऑफ कॉमर्सने उड्डाणपुलाचे बांधकाम मंद गतीने सुरू असल्याबाबत उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात याचिका दाखल केली होती. ११ ऑक्टोबर २०१५ रोजीच्या सुनावणीत न्यायालयाने रेल्वे विभागाला उड्डाणपूल महामंडळास हस्तांतरित करण्याबाबत व १५ दिवसात कामे सुरू करण्याचे निर्देश दिले होते. तसेच ७ जानेवारी २०१६ च्या आदेशात शासनाला मेट्रो तसेच महामंडळाच्या वादात मध्यस्ती करून तोडगा काढण्याचे आदेश दिले होते. त्यानंतर कामाला गती मिळाली.

 

टॅग्स :nagpurनागपूरrailwayरेल्वे