रामटेकचा गड जाणार कुणाच्या ताब्यात?

By Admin | Updated: June 9, 2014 01:14 IST2014-06-09T01:14:32+5:302014-06-09T01:14:32+5:30

रामटेक विधानसभा मतदारसंघात २00९ च्या निवडणुकीप्रमाणेच यावेळीही चौरंगी लढत होण्याची शक्यता दिसून येत आहे. गोंडवाना गणतंत्र पक्ष ऐनवेळी कोणाला उमेदवार म्हणून पुढे करणार, यावर तेथील निवडणुकीचे

Ramtek's fort will be in possession of? | रामटेकचा गड जाणार कुणाच्या ताब्यात?

रामटेकचा गड जाणार कुणाच्या ताब्यात?

विधानसभा निवडणूक : संभाव्य उमेदवारांची मतदारसंघात भाऊगर्दी
गणेश खवसे - नागपूर
रामटेक विधानसभा मतदारसंघात २00९ च्या निवडणुकीप्रमाणेच यावेळीही चौरंगी लढत होण्याची शक्यता दिसून येत आहे. गोंडवाना गणतंत्र पक्ष  ऐनवेळी कोणाला उमेदवार म्हणून पुढे करणार, यावर तेथील निवडणुकीचे समीकरण अवलंबून असणार आहे.
२00९ च्या निवडणुकीत अँड. आशिष जयस्वाल यांनी ३ हजार ३६१ मतांनी काँग्रेसच्या सुबोध मोहिते यांचा पराभव केला. जयस्वाल यांना ४९ हजार  ९३७ तर मोहिते यांना ४६ हजार ५७६ मते मिळाली होती. त्यांच्याखालोखाल मते गोंडवाना गणतंत्र पक्षाचे उमेदवार डी. मल्लिकार्जुन रेड्डी (३४ हजार  ३0४) यांना मिळाली होती. बसपाचे महादेव कामळे (६ हजार ६0२) यांनाही भरघोस मते पडली. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे राजू ठाकरे यांना १ हजार  १६७ मते मिळाली होती.
आगामी २0१४ च्या विधानसभा निवडणुकीतही यापेक्षा वेगळे चित्र असणार नाही. शिवसेनेकडून विद्यमान आमदार आशिष जयस्वाल यांनाच  उमेदवारी मिळणार आहे. त्यादृष्टीने त्यांनी प्रयत्न सुरू केले. काँग्रेसने आपला उमेदवार म्हणून कुणा एकाला अद्याप समोर आणलेले नाही. सध्या  काँग्रेसकडून माजी मंत्री रणजित देशमुख यांचे पुत्र डॉ. अमोल देशमुख, चंद्रपाल चौकसे यांची नावे चर्चेत आहेत.
त्यांच्यासोबतच राष्ट्रवादीचे डी. मल्लिकार्जुन रेड्डी हे सुद्धा निवडणुकीच्या तयारीत आहेत. काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीमध्ये ही जागा काँग्रेसकडे गेली आहे.  त्यामुळे या निवडणुकीतही आघाडी कायम राहिल्यास रेड्डी हे बंडखोरी करतील असे दिसते. त्यातल्यात्यात आम आदमी पार्टीकडून योगेश वाडीभस्मे  यांनी तयारी चालविली आहे. त्यादृष्टीने त्यांनी मतदारसंघ पिंजून काढायला सुरुवात केली आहे. तर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा उमेदवारही पूर्ण ताकदीने  या निवडणुकीत उतरणार असून, बहुजन समाज पक्षाचीही मतांची वेगळी समीकरणे आहेत. त्यामुळे प्रमुख तीन उमेदवारांव्यतिरिक्त बसप, मनसे, आप,  फॉरवर्ड ब्लॉक, गोंडवाना मुक्ती सेना आणि अपक्ष उमेदवार एकूण किती मते जुळवितात त्यावरही रामटेकचा आमदार कोण राहील, हे अवलंबून आहे.
सध्या तरी शिवसेना, काँग्रेस, गोंडवाना गणतंत्र पक्ष आणि आप अशी चौरंगी लढत होणार असल्याची चिन्हे दिसत आहे. शिवसेनेकडून उमेदवारी  निश्‍चित आहे. उर्वरित तीन पक्षाकडून ऐनवेळी कोणाचे नाव समोर येते त्यावरही रामटेक विधानसभेत निवडणूक तिरंगी, चौरंगी होते की नाही, हे  निश्‍चित होईल. उमेदवारी निश्‍चित व्हायची असली तरी प्रमुख पक्षाच्या उमेदवारांव्यतिरिक्त अपक्षांनीही कंबर कसली आहे.
 

Web Title: Ramtek's fort will be in possession of?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.