शहरं
Join us  
Trending Stories
1
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
2
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
3
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
4
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
5
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
6
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
7
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
8
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
9
अजित पवार यांचा अधिकाऱ्यांना सज्जड दम; सांगितलेली कामे केली नाहीत, तर पुढच्या बैठकीला..
10
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
11
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
12
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
13
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
14
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
15
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी
16
भारतात द्वेषाचा वणवा पेटवण्याचं एक षड्‌यंत्र; ‘बदला’ घेण्याची घाई नको, ‘धडा’ शिकवला पाहिजे
17
नरेंद्र मोदी यावेळी बालाकोटच्याही पुढे जाणार?; पुढच्या दोन आठवड्यांत आणखी कठोर पावले
18
हम सब एक है! अतिरेकी व त्यांच्या सूत्रधारांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी
19
"आणखी किती वेळ सहन करणार..."; चिठ्ठी लिहून नवी मुंबईतील विकासकानं संपवलं आयुष्य
20
मेमध्ये जिल्हा समित्या, जूनमध्ये महामंडळे; भाजपाच्या वरिष्ठांचा कार्यकर्त्यांना शब्द

रामनाथ सोनवणे यांचा स्मार्ट सिटी सीईओ पदाचा राजीनामा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 12, 2020 23:25 IST

नागपूर स्मार्ट अ‍ॅन्ड सस्टेनेबल सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेडचे मुख्य कार्यकारी अधिकारी(सीईओ)पदाचा डॉ. रामनाथ सोनवणे यांनी राजीनामा दिला आहे.

ठळक मुद्देमहाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधिकरण सचिवपदी नियुक्ती

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : नागपूर स्मार्ट अ‍ॅन्ड सस्टेनेबल सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेडचे मुख्य कार्यकारी अधिकारी(सीईओ)पदाचा डॉ. रामनाथ सोनवणे यांनी राजीनामा दिला आहे. त्यांची नियुक्ती महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधिकरणच्या सचिवपदी करण्यात आली आहे. स्मार्ट सिटी प्रकल्पाच्या स्थापनेपासून ते सीईओ पदावर कार्यरत होते. ते शुक्रवारी मुंबईला आपल्या नवीन पदावर रुजू होतील.पत्रकारांशी चर्चा करताना सोनवणे म्हणाले, पश्चिम महाराष्ट्रात विविध पदाची जबाबदारी सांभाळताना सेवानिवृत्तीला दोन वर्षांचा कालावधी शिल्लक असताना महापालिकेत अपर आयुक्तपदी बदली झाली. या पदावर मी समाधानी नव्हतो. परंतु नागपुरातील नागरिक व नेत्यांमुळे या शहराविषयी आपुलकी निर्माण झाली. स्मार्ट सिटी प्रकल्पाची जबाबदारी मिळाली. हा प्रकल्प प्रभावीपणे राबविण्याचा प्रयत्न केला. माझ्या कार्यकाळात नागपूरचे स्मार्ट सिटी प्रकल्पात देशातील १०० शहरात अव्वल दोन क्रमांकावर स्थान कायम आहे. परंतु स्मार्ट सिटी प्रकल्पाच्या कामासंदर्भात मी समाधानी नाही.कायदेशीर व दीर्घ प्रक्रियेतून हा प्रकल्प जात आहे. त्यात अवकाळी पाऊस याचा फटका प्रकल्पाला बसत आहे. पूर्णक्षमतेने प्रकल्पाचे काम करण्यात अडचणी येत आहेत. येणाऱ्या नवीन सीईओ यांच्यापुढेही हे आव्हान राहणार आहे. याही परिस्थितीत या प्रकल्पाला रुळावर आणण्याचे प्रयत्न केल्याचे सोनवणे म्हणाले.सेफ अ‍ॅन्ड स्मार्ट सिटी प्रकल्पामुळे १८०० गुन्ह्यांचा उलगडा झाला. यातील ९० गुन्हे खुनाचे आहेत. स्मार्ट सिटी प्रकल्पातील ५२ पैकी १६ रस्ते, ४ जलकुंभ, २८ पैकी ९ पुलांचे काम सुरू आहे. लवकरच १ हजार फ्लॅटचे काम सुरू केले जाणार आहे. जून २०२१ पर्यंत हा प्रकल्प पूर्ण करावयाचा आहे. यात एकूण २१ प्रकल्पांचा समावेश आहे. यातील दोन पूर्ण झाले असून, दोन प्रगतिपथावर आहेत.स्मार्ट सिटी प्रकल्पातील अडचणी दूर करण्याचा प्रयत्न केला. आलेल्या आक्षेपांवर लवादाच्या माध्यमातून सुनावणी झाली. दोन हजार कुटुंब या प्रकल्पामुळे बाधित होत आहेत. यातील एक हजार लोकांसाठी घरकूल योजना राबविली जाणार आहे. ज्यांना रोख मोबदला हवा आहे, त्यांना तो दिला जात असल्याचे सोनवणे यांनी सांगितले.खात्यात २५४ कोटी जमाप्रकल्पासाठी निधीची कमी नाही. खात्यात २५४ कोटी जमा आहेत. दरवर्षी २०० कोटींचा निधी मिळणार आहे. उपलब्ध निधी खर्च न झाल्याने नवीन मिळाला नाही. केंद्र सरकारकडून मिळालेले १९६ कोटी पूर्ण खर्च झाले. राज्याकडून १४३ कोटी मिळाले. यातील २० कोटी खर्च झाले. नासुप्रकडून १०० कोटी मिळाले. आजवर सेफ अ‍ॅन्ड स्मार्ट सिटी प्रकल्पावर १०३ कोटी, रस्ते बांधकामावर ६५ कोटी तर घरकुलांवर १२ कोटी खर्च झाल्याची माहिती सोनवणे यांनी दिली.

टॅग्स :Smart Cityस्मार्ट सिटीResignationराजीनामा