रंगभूमी प्रयोग परिनिरीक्षण मंडळावर ज्येष्ठ रंगकर्मी रमेश थोरात यांची नियुक्ती
By Admin | Updated: October 14, 2015 01:28 IST2015-10-14T01:28:13+5:302015-10-14T01:28:13+5:30
विदर्भातून फक्त तिघांचीच नियुक्ती.

रंगभूमी प्रयोग परिनिरीक्षण मंडळावर ज्येष्ठ रंगकर्मी रमेश थोरात यांची नियुक्ती
अकोला: येथील ज्येष्ठ रंगकर्मी, पथनाट्यकार, नटश्रेष्ठ निळू फुले आर्ट फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष रमेश थोरात यांची राज्य शासनाने ९ ऑक्टोबर रोजी शासनाच्या रंगभूमी प्रयोग परिनिरीक्षण मंडळ, मुंबईच्या सदस्यपदी नियुक्ती केली. विदर्भातून फक्त तिघांचीच नियुक्ती करण्यात आली आहे. रमेश थोरात हे ज्येष्ठ रंगकर्मी असून, ते कार्यकारी अभियंता पदाहून सेवानवृत्त झाले आहेत. अनेक पुरस्कारांचे मानकरी असलेले, रौप्य पदकांचे मानकरी रमेश थोरात यांनी राज्य नाट्यस्पर्धेचे परीक्षक म्हणून अनेकदा काम केले. ते नटश्रेष्ठ स्व. निळू फुलेंचे जीवलग मित्र आहेत. सध्या अनेक लघुचित्रपट, नाट्यमालिकांमध्येसुद्धा ते अभिनय करतात. त्यांच्या ह्यकचर्या हिंदुस्थानीह्ण या एकपात्रीचे १८0८ प्रयोग झाले आहेत. सोबतच कविवर्य लोकनाथ यशवंत यांच्या चार कवितासंग्रहातील निवडक कवितांवर आधारित स्वलिखित एकपात्री ह्यदंगल शांततेत पार पडलीह्ण आणि हिंदीतील एक स्वलिखित एकपात्री ह्यकफन को जेब नही होतीह्ण याचेही प्रयोग सुरू आहेत. १३७९१ पथनाट्यांचे प्रयोग महाराष्ट्रभर करणारे ते एकमेव पासष्टी गाठलेले रंगकर्मी आहेत.