अवैध पार्किंगने केली रामदासपेठेची कोंडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 14, 2021 04:11 IST2021-09-14T04:11:18+5:302021-09-14T04:11:18+5:30

पंचशील चौकापासून पश्चिमेकडे दुर्गाप्रसाद सराफ यांच्या घरापर्यंतचा नागनदीला चिकटून असलेला कॅनल रोड १५ फूट रुंदीचा आहे. हा रस्ता व ...

Ramdaspeth's dilemma due to illegal parking | अवैध पार्किंगने केली रामदासपेठेची कोंडी

अवैध पार्किंगने केली रामदासपेठेची कोंडी

पंचशील चौकापासून पश्चिमेकडे दुर्गाप्रसाद सराफ यांच्या घरापर्यंतचा नागनदीला चिकटून असलेला कॅनल रोड १५ फूट रुंदीचा आहे. हा रस्ता व नदीच्या सुरक्षा भिंतीला लागून असलेली ४ ते ५ फुटाचा फूटपाथ आहे. फूटपाथवर अधामधात चहाटपरी आहेत. मात्र, संपूर्ण रस्त्यावर चारचाकी ठेवलेल्या असतात. त्यामुळे, वाहकांसाठी उरतो तो केवळ १० ते १२ फुटाचा रस्ता.

सेंट्रल मॉल ते दीक्षाभूमी चौक

सेंट्रल मॉल ते दीक्षाभूमी चौकापर्यंतच्या या मार्गावरही दोन्ही बाजूला चारचाकी पार्क केलेल्या असतात. विशेषत: सेंट्रल मॉलचा चौक अतिशय ट्राफिकचा असतो. येथेच चहाचे, नाश्त्याचे स्टॉल्सही लागलेले असतात. त्यामुळे, वाहकांना वाहन काढणे तारेवरची कसरत होते.

रामदासपेठेची वस्ती

रामदासपेठेमधील वस्ती आणि लेण्ड्रा पार्क परिसरातील वस्तीमध्ये सिंगल लाईन पार्किंगचे बोर्ड लागल्याने या वस्त्यांमध्ये तेवढीशी तक्रार कुणाचीही नाही. येथे पोलीस सतत गस्तीवर असल्याने अधामधात कुण्या वाटसरूचे वाहन पार्क झालेले दिसले तर लागलीच कारवाई केली जाते किंवा वाहन योग्य स्थळी पार्क करण्याचे सुचवले जाते.

...............

Web Title: Ramdaspeth's dilemma due to illegal parking

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.