अगस्ती आश्रमात रामायण प्रवचन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 2, 2020 04:10 IST2020-12-02T04:10:36+5:302020-12-02T04:10:36+5:30
रामटेक : स्थानिक गडमंदिर परिसरात असलेल्या अगस्ती आश्रमात काेजागिरी पाैर्णिमेपासून रामायण प्रवचनाला प्रारंभ करण्यात आला आहे. संत तुकाराम राेज ...

अगस्ती आश्रमात रामायण प्रवचन
रामटेक : स्थानिक गडमंदिर परिसरात असलेल्या अगस्ती आश्रमात काेजागिरी पाैर्णिमेपासून रामायण प्रवचनाला प्रारंभ करण्यात आला आहे. संत तुकाराम राेज सकाळी ६ ते ७ वाजेपर्यंत प्रवचन करीत असून, त्याचे ध्वनिक्षेपण केले जात आहे.
संत गाेपालबाबा यांच्या निधनानंतर त्यांचे वारस म्हणून तुकाराम महाराज मुनी अगस्ती आश्रमाचा कार्यभार सांभाळत आहेत. काेजागिरी पाैर्णिमेपासून त्रिपूर पाैर्णिमेपर्यंत रामायण प्रवचन करण्याची या आश्रमाची परंपरा आहे. काेराेनामुळे त्यात खंड पडण्याची शक्यता बळावली हाेती. मात्र, तुकाराम महाराज एका खाेलीत एकटेच प्रवचन करीत असून, त्याचे ध्वनिक्षेपण केले जात असल्याने नागरिक आपापल्या घरी बसून प्रवचनाचा लाभ घेत आहेत. दरवर्षी गडमंदिर परिसरात त्रिपूर पाैर्णिमेला माेठा कार्यक्रम आयाेजित केला जाताे. काेराेनामुळे यावर्षी केवळ माेजक्या व्यक्तींच्या उपस्थितीत पूजा केली जाणार आहे.