राम झुल्याजवळ दुचाकीस्वाराला लुटले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 26, 2021 04:07 IST2021-05-26T04:07:20+5:302021-05-26T04:07:20+5:30

नागपूर : सासुरवाडीकडे निघालेल्या दुचाकीस्वाराला दोन भामट्यांनी मारहाण करत लुटले. सोमवारी रात्री ९ च्या सुमारास मेयो हॉस्पिटलच्या मागे राम ...

Ram robbed the two-wheeler near the swing | राम झुल्याजवळ दुचाकीस्वाराला लुटले

राम झुल्याजवळ दुचाकीस्वाराला लुटले

नागपूर : सासुरवाडीकडे निघालेल्या दुचाकीस्वाराला दोन भामट्यांनी मारहाण करत लुटले. सोमवारी रात्री ९ च्या सुमारास मेयो हॉस्पिटलच्या मागे राम झुल्याजवळ ही घटना घडली. नरेंद्र विठ्ठलराव हिवसे (वय ३७) हे पारशिवणी तालुक्यातील तेलंखेडी सातक येथे राहतात. सोमवारी ते त्यांच्या गिट्टीखदान, बोरगाव येथील मामांना भेटण्यासाठी आले होते. तेथून रात्री ९ च्या सुमारास दुचाकीने ते भुतेश्वर नगरातील आपल्या सासुरवाडीला जात होते. राम झुल्याजवळ अंधाऱ्या ठिकाणी दोन भामट्यांनी त्यांना अडवले. मारहाण करून जिवे मारण्याचा धाक दाखवत आरोपींनी त्यांच्या खिशातील सातशे रुपये, मोबाईल, पॅनकार्ड आणि एटीएम कार्ड हिसकावून घेतले. त्यानंतर हिवसे यांची ॲक्टिव्हा हिसकावून आरोपी पळून गेले. वर्दळीच्या ठिकाणी येऊन हिवसे यांनी मदतीसाठी आरडाओरड केली. त्यानंतर तहसील पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली. पोलिसांनी जबरी चोरीचा गुन्हा दाखल केला. आरोपीचा शोध घेतला जात आहे.

---

Web Title: Ram robbed the two-wheeler near the swing