भारतीय नववर्ष स्वागत समितीतर्फे रॅली
By Admin | Updated: April 8, 2016 02:42 IST2016-04-08T02:42:18+5:302016-04-08T02:42:18+5:30
पारंपरिक वेशभूषा करून फेटे घातलेल्या महिलांनी भारतीय नववर्ष स्वागत समितीतर्फे गुढीपाडव्याच्या पूर्वसंध्येला आग्यारामदेवी मंदिरापासून भव्य महिला रॅली काढली.

भारतीय नववर्ष स्वागत समितीतर्फे रॅली
पारंपरिक वेशभूषा : पारंपरिक खेळ, प्रात्यक्षिकांचे सादरीकरण
नागपूर : पारंपरिक वेशभूषा करून फेटे घातलेल्या महिलांनी भारतीय नववर्ष स्वागत समितीतर्फे गुढीपाडव्याच्या पूर्वसंध्येला आग्यारामदेवी मंदिरापासून भव्य महिला रॅली काढली. यात शेकडो महिला सहभागी झाल्या होत्या.
रॅलीचा शुभारंभ आग्याराम देवी मंदिरापासून झाला. रॅलीला माजी महापौर अर्चना डेहनकर, शिवानी दाणी, झोन सभापती प्रभा जगनाडे,जेसीआयच्या आसावरी कोठीवान, श्री माली महिला मंडळाच्या साधना दवे यांनी झेंडी दाखविली. रॅली गणेशपेठ पोलीस ठाणे, श्रद्धा फरसाण, फवारा चौक, दसरा रोड, महाल चौक, तीननल चौक, भारतमाता चौक, गोळीबार चौक, हंसापुरीमार्गे, श्री पोद्दारेश्वर राम मंदिरात पोहोचली. सामूहिक रामरक्षा पठनानंतर सर्व महिलांना संकल्प देऊन रॅलीचा समारोप झाला. रॅलीदरम्यान विविध चौकात पारंपरिक खेळ, प्रात्यक्षिके दाखविण्यात आली. रॅलीचे विविध चौकात स्वागत करण्यात आले. रॅलीचे संयोजन श्रद्धा पाठक यांनी केले. यावेळी विवेकानंद सांस्कृतिक मंडळ रुईकर रोड, जीवन विद्या मिशन गांधी पुतळा, नेचर अँड कल्चर, बडकस चौक, युवा चेतना मंच शिवाजी पुतळा, श्री माली महिला मंडळ बडकस चौक, माळवी स्वर्णकार महिला मंडळ, दक्षिणामूर्ती मंदिर महिला मंडळ, दुर्गा वाहिनी, श्रीसंती महिला मंडळ इतवारी, तेजस्विनी शिक्षण संस्था, बापुसाहेब महाशब्दे महाविद्यालय, अर्नेजा इन्स्टिट्यूट आॅफ नर्सिंग सायन्सेस, रामरक्षा पठन मंडळ तुळशीबाग रोड, लक्ष्मीनारायण भजन मंडळ कोठी रोड, अतिउत्साही महिला मंडळ बुधवारी, गोपाळकृष्ण भजन मंडळ साधु मंदिर महाल, भगिनी निवेदिता बचतगट मॉडेल मिल, माऊली भजन मंडळ, गंगामाता भजन मंडळ, महालक्ष्मी महिला बचतगट गणेशपेठ आदी महिला संघटनांचा समावेश होता. (प्रतिनिधी)