राजू पारवे जनसेवा प्रतिष्ठान व कुही तालुका पत्रकार संघ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 12, 2021 04:07 IST2021-07-12T04:07:08+5:302021-07-12T04:07:08+5:30

कुही : लाेकमतने स्वातंत्र्य सेनानी, लाेकमतचे संस्थापक जवाहरलाल दर्डा यांच्या जयंतीनिमित्त सुरू केलेल्या रक्त संकलन माेहिमेंतर्गत राजू पारवे जनसेवा ...

Raju Parve Janseva Pratishthan and Kuhi Taluka Press Association | राजू पारवे जनसेवा प्रतिष्ठान व कुही तालुका पत्रकार संघ

राजू पारवे जनसेवा प्रतिष्ठान व कुही तालुका पत्रकार संघ

कुही : लाेकमतने स्वातंत्र्य सेनानी, लाेकमतचे संस्थापक जवाहरलाल दर्डा यांच्या जयंतीनिमित्त सुरू केलेल्या रक्त संकलन माेहिमेंतर्गत राजू पारवे जनसेवा प्रतिष्ठान व कुही तालुका पत्रकार संघ यांच्या संयुक्त विद्यमाने रविवारी (दि. ११) ग्रामपंचायत भवन मांढळ (ता. कुही) येथे भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.

शिबिराचे उद्घाटन आ. राजू पारवे यांच्या हस्ते दीप प्रज्वलनाने करण्यात आले. या शिबिरात १६ रक्तदात्यांनी रक्तदान करून राष्ट्रीय व सामाजिक बांधिलकी जोपासली. कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून सरपंच शाहू कुलसंगे, उपसरपंच सुखदेव जीभकाटे, शिवसेनेचे जिल्हा प्रमुख संदीप इटकेलवार, लीलाधर धनविजय, उपासराव भुते, पांडुरंग बुराडे, भागेश्वर फेंडर, पंचायत समिती सदस्य मंदा डहारे, हरीश कढव, बंडू वैद्य, प्रदीप कुलरकर, सुरेश कुकडे, पांडुरंग मेश्राम, पुंडलिक राऊत, जितू गिरडकर, विकास ठाकरे, गीता सोनकुसरे उपस्थित होते.

प्रदीप घुमडवार यांनी प्रास्ताविकातूनस शिबिराच्या आयाेजनाचा उद्देश विशद केला. संचालन प्रा. सुरेश नखाते यांनी केले तर हरिभाऊ लुटे यांनी उपस्थितांसाेबतच रक्तदात्यांचे आभार मानले. यशस्वितेसाठी सज्जन पाटील, दीपक डहारे, राजेंद्र बागडे, मनोज पंचबुद्धे, प्रमोद ठवकर, विनोद तिजारे, होमेश लांडगे, प्रकाश वंजारी यांनी सहकार्य केले.

...

रक्तदात्यांनी नांवे

ए पॉझिटिव्ह - ४

विलास दुधपचारे, टेकराम शेंडे, देवीदास गाढवे, रोशन गवळी.

...

बी पॉझिटिव्ह - ४

विकास दिघोरे, नरेश दिघोरे, अमित डहारे, रायभान वाढई.

..

एबी पाॅझिटिव्ह - ३

सचिन लांजेवार, ज्ञानेश्वर तिरपुडे, दीपक डहारे.

...

ओ पॉझिटिव्ह - ५

नरेंद्र राऊत, बाळकृष्ण बांते, बादल देशमुख, आशिष धनजोडे, ज्ञानेश्वर ठवकर.

...

Web Title: Raju Parve Janseva Pratishthan and Kuhi Taluka Press Association