राजू निकोलस यांचे निधन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 04:47 IST2021-02-05T04:47:26+5:302021-02-05T04:47:26+5:30
राजू गॅब्रियल निकोलस (५०, रा. मार्टिननगर) यांचे निधन झाले. रविवारी दुपारी २ वाजता त्यांच्या पार्थिवावर जरीपटका ख्रिश्चन दफनभूमीत अंत्यसंस्कार ...

राजू निकोलस यांचे निधन
राजू गॅब्रियल निकोलस (५०, रा. मार्टिननगर) यांचे निधन झाले. रविवारी दुपारी २ वाजता त्यांच्या पार्थिवावर जरीपटका ख्रिश्चन दफनभूमीत अंत्यसंस्कार होतील. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, दोन मुली असा परिवार आहे.
मधुकर कुळकर्णी ()
मधुकर रामचंद्र कुळकर्णी (९६) यांचे निधन झाले. अंबाझरी घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात पत्नी, तीन मुले, एक मुलगी, नातवंड असा परिवार आहे.
हरिशंकर सोनी ()
हरिशंकर सोनी (७५, रा. चिमूरकर ले-आऊट) यांचे निधन झाले. मानेवाडा घाट येथे अंत्यसंस्कार झाले. ते सोनी समाज मित्र मंडळाचे सदस्य पप्पू सोनी यांचे वडील होत.
शशिकला चकोले ()
शशिकला दयाराम चकोले (६५, रा. नंदनवन) यांचे निधन झाले. रविवारी सकाळी १० वाजता त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार होतील. गायत्री एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष दयाराम चकोले यांच्या त्या पत्नी होत.
पुष्पा गुडधे ()
पुष्पा हेमराज गुडधे (७०, रा. सीताबर्डी) यांचे निधन झाले. रविवारी सकाळी ११.३० वाजता मोक्षधाम घाट येथे अंत्यसंस्कार होतील. त्यांच्या पश्चात तीन मुले असा परिवार आहे.
अंकुश वडोदकर ()
अंकुश श्यामकांत वडोदकर (४१, रा. महाल) यांचे निधन झाले. गंगाबाई घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात आई, वडील, भाऊ असा परिवार आहे.
सरस्वतीबाई बरडे ()
सरस्वतीबाई भालचंद्रराव बरडे (८६, रा. नवीन सुभेदार ले-आऊट) यांचे निधन झाले. रविवारी सकाळी ११ वाजता मानेवाडा घाट येथे अंत्यसंस्कार होतील. त्यांच्या पश्चात तीन मुले, सुना, नातवंड असा परिवार आहे.
वच्छलाबाई पांढूरकर (स्कॅनिंग)
वच्छलाबाई अजाबराव पांढूरकर (७५, रा. ईश्वरनगर) यांचे निधन झाले. रविवारी सकाळी १०.३० वाजता मानेवाडा घाट येथे अंत्यसंस्कार होतील. त्यांच्या पश्चात पाच मुले, तीन मुली असा परिवार आहे.
ताराबाई वानकर (स्कॅनिंग)
ताराबाई बापुरावजी वानकर (७८) यांचे निधन झाले. अंबाझरी घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर को-ऑपरेटिव्ह बँकेचे अध्यक्ष गुलाबराव वानकर यांच्या त्या भगिनी होत.