शहरं
Join us  
Trending Stories
1
आता स्ट्रेट ऑफ होर्मुझवर असणार अमेरिकेची करडी नजर; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
2
रोहितनं मैदान सोडलं तिथंच मॅच फिरली; वानखेडेवर RCB पुन्हा ठरली 'धुरंधर'! MI ची पराभवाची हॅटट्रिक
3
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
4
एनसीबी’ने नागपुरात पकडला २० कोटींचा गांजा, ओडिशातून येत होती खेप
5
Rohit Sharma retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना हिटमॅन रोहित शर्मानं का सोडलं मैदान?
6
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
7
Virat Kohli New Record : विराट कोहलीनं रचला इतिहास; MI विरुद्ध जे कुणालाच नाही जमलं ते करून दाखवलं
8
ठाणे महानगरपालिकेचा भोंगळ कारभार, २४ तासांचा शटडाउन, ३६ तास उलटले तरी नागरिकांना पाणी नाही!
9
IPL 2026 MI vs RCB Phil Salt Record : सॉल्टची स्फोटक खेळी; सेंच्युरी हुकली, त्यातही साधला मोठा डाव
10
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
11
IPL 2026 : वानखेडेवर भावूक क्षण! MI-RCB खेळाडूंसह प्रेक्षकांकडून Asha Bhosle यांना श्रद्धांजली (VIDEO)
12
Travel : भारताचं सायबेरिया! एप्रिलमध्येही असते शून्याखाली तापमान;-६० अंशांपर्यंत घसरतो पारा
13
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
14
पाकिस्तानात आयोजित अमेरिका–इराणमधील चर्चा निष्फळ होण्याची 5 प्रमुख कारणे, जाणून घ्या...
15
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
16
चार्जरवरील 'R' अक्षराचा अर्थ माहितीये का? फेक चार्जर ओळखण्याची 'ही' आहे सर्वात सोपी ट्रिक; ९९% लोक करतात दुर्लक्ष
17
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
18
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
19
उन्हाळ्यात खरबूज खाण्याचे शौकीन आहात? 'या' सोप्या टिप्स वापरा अन् ओळखा गोड आहे की नाही!
20
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
Daily Top 2Weekly Top 5

रजत मद्रेला जामीन नाकारला

By admin | Updated: June 11, 2017 02:45 IST

विशेष न्यायालय : आमदार निवासातील अत्याचार प्रकरण

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : आमदार निवासमधील एका १७ वर्षीय मुलीवरील अत्याचारप्रकरणी पोक्सो विशेष न्यायालयाच्या न्यायाधीश माधुरी देशपांडे यांच्या न्यायालयाने आरोपी राजनगर संकुल येथील रहिवासी रजत तेजलाल मद्रे याचा जामीन अर्ज फेटाळून लावला. प्रकरण असे की, रजत हा पेंटिंगची कामे करायचा. पीडित मुलगी ही रजतची मैत्रीण होती. याच प्रकरणातील मुख्य आरोपी मनोज भगत याच्या ज्वेलर्सच्या दुकानात पीडित मुलगी काम करायची. अधूनमधून तिला भेटायला रजत हा भगतच्या दुकानावर यायचा. त्यामुळे त्याची भगतसोबत मैत्री झाली होती. रजतला मदत करणे आणि स्वत:लाही पीडित मुलीचा गैरफायदा घेता यावा म्हणून भगतने योजना आखली होती. योजनेचा भाग म्हणून भगत पीडित मुलीच्या घरी गेला होता.‘आमच्या कुटुंबातील लोक भोपाळला जात आहेत. त्यांच्यासोबतच तुमच्या मुलीला घेऊन जातो’, असे भगतने पीडित मुलीच्या आईला खोटे सांगितले होते. १४ एप्रिल २०१७ रोजी भगत हा पीडित मुलीला कारमध्ये बसवून घेऊन गेला होता. त्याने तिला आमदार निवास येथे नेले होते आणि पार्किंगमध्ये कार उभी करून तिच्यावर अत्याचार केला होता. त्यानंतर त्याने आमदार निवासातील एका कर्मचाऱ्याच्या मदतीने ३२० क्रमांकाची खोली घेतली होती. त्यासाठी एक हजार रुपये भरून पावतीही घेतली होती. भगतने रजतला फोन करून बोलावून घेतले होते आणि पीडित मुलीला त्याच्या स्वाधीन केले होते. त्यानंतर १४ ते १७ एप्रिलपर्यंत रजतने पीडित मुलीवर अत्याचार केले होते. दरम्यान, मुलगी घरी परतली नाही म्हणून पीडित मुलीच्या आईने गिट्टीखदान पोलीस ठाणे गाठून तक्रार नोंदवली होती. त्यावरून भादंविच्या ३६३ कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. अपहरणाचा गुन्हा दाखल झाल्याचे समजताच मूळ प्रकरणावर पांघरुण घालण्यासाठी रजतने १७ एप्रिल रोजी तिला जयपूरचे तिकीट काढून देऊन रेल्वेत बसवून रवाना केले होते. जयपूरला पीडित मुलीची मैत्रीण राहते. ही बाब पोलिसांना समजताच काटोल रेल्वे स्थानकावरून पीडित मुलीला पोलिसांनी ताब्यात घेतले होते. चौकशीत तिने घडलेली घटना सांगताच पोलिसांनी भादंविच्या ३७६(डी),३४, लैंगिक अपराधांपासून बालसंरक्षण कायद्या(पोक्सो)च्या ३,४,६ कलमान्वये गुन्हा दाखल करून मनोज भगत आणि रजत मद्रे यांना १८ एप्रिल रोजी अटक केली होती. न्यायालयीन कोठडी कारागृहात असलेल्या रजत मद्रे याने जामिनासाठी अर्ज दाखल करताच सरकार पक्षाच्या वतीने जामिनास तीव्र विरोध करण्यात आला. न्यायालयाने पीडित मुलीचा वैद्यकीय अहवाल, सीसीटीव्ही फुटेज आणि आमदार निवासातील कर्मचाऱ्यांचे बयाण लक्षात घेऊन आरोपीचा जामीन अर्ज फेटाळून लावला. न्यायालयात सरकारच्यावतीने सहायक सरकारी वकील श्याम खुळे, आरोपीच्या वतीने अ‍ॅड. अमित बंड यांनी काम पाहिले. या प्रकरणाच्या तपास अधिकारी महिला पोलीस उपनिरीक्षक शालिनी किनाके या आहेत.