- हजारो साड्यांचा स्टॉक : खरेदीसाठी महिलांची गर्दी
वाणिज्य बातमी ... १० बाय ३ ...
नागपूर : राजस्थानी महिला मंडळ, लोहापूल, टेकडी रोड, सीताबर्डी येथे साडी आणि लेडिजवेअर कपड्यांच्या भव्य सेल सुरू असून महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.
ग्राहकांचा प्रतिसाद पाहता सेल ३१ डिसेंबरपर्यंत वाढविण्यात आला आहे. सेलमध्ये २० हजारांपेक्षा जास्त किमतीच्या साड्यांची रेंज सादर केली असून नागपूरच्या ग्राहकांना केवळ २५० रुपयांत खरेदीची संधी आहे. यामध्ये डिझायनर बेळगाव साडी, शिफॉन, बेंगलोर, बनारसी, साऊथ कॉटन, साऊथ सिल्क, कोटा चेक, संभलपुरी, जरी बॉर्डर, पेज वर्क आदी साड्यांसह हजारो साड्यांचा स्टॉक आहे. याशिवाय जास्त किमतीचे ब्लाऊज पीस, ब्रॅण्डेड ब्रा, पॅन्टी, ब्रॅण्डेड कुर्ती, वेस्टर्न टॉप लेगिन्स, पायजामा, कॅप्री, गाऊन, स्कर्ट आदी अत्यंत कमी दरात उपलब्ध आहेत. याशिवाय फॅन्सी पार्टीवेअर साड्यांचा संग्रह आहे. सेलमध्ये महिलांची गर्दी असून अखेरचे दोन दिवसासाठी असलेल्या सेलमध्ये खरेदी करून आर्थिक बचत करावी, असे आयोजकांनी म्हटले आहे. (वा.प्र.)