शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

नागपुरात बिल्डर्सविरोधात ग्राहकराजाची सर्वाधिक नाराजी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 13, 2018 22:41 IST

बाजारात विविध माध्यमांतून होणाऱ्या फसवणुकीचे प्रमाण वाढत असल्याची ओरड ग्राहकांकडून करण्यात येते. परंतु प्रत्यक्षात आपल्यावर झालेल्या अन्यायाविरोधात दाद मागण्यासाठी मात्र फारच कमी लोक पुढाकार घेतात. नागपुरातील जिल्हा ग्राहक मंचाकडे २०१६ सालापासून सुमारे १६०० तक्रारी दाखल करण्यात आल्या. यातील सर्वात जास्त तक्रारी बिल्डर्सच्या विरोधात होत्या, हे विशेष. नागपूरची लोकसंख्या लक्षात घेता, त्या मानाने हा आकडा फारच कमी आहे. माहितीच्या अधिकारातून ही बाब समोर आली आहे.

ठळक मुद्देअतिरिक्त जिल्हा ग्राहक मंचाकडे एकूण तक्रारींचे प्रमाण कमीच : पाच वर्षांत अवघ्या १३०० तक्रारी

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : बाजारात विविध माध्यमांतून होणाऱ्या फसवणुकीचे प्रमाण वाढत असल्याची ओरड ग्राहकांकडून करण्यात येते. परंतु प्रत्यक्षात आपल्यावर झालेल्या अन्यायाविरोधात दाद मागण्यासाठी मात्र फारच कमी लोक पुढाकार घेतात. नागपुरातील जिल्हा ग्राहक मंचाकडे २०१६ सालापासून सुमारे १६०० तक्रारी दाखल करण्यात आल्या. यातील सर्वात जास्त तक्रारी बिल्डर्सच्या विरोधात होत्या, हे विशेष. नागपूरची लोकसंख्या लक्षात घेता, त्या मानाने हा आकडा फारच कमी आहे. माहितीच्या अधिकारातून ही बाब समोर आली आहे.उपराजधानीतील माहिती अधिकार कार्यकर्ते अभय कोलारकर यांनी १ जानेवारी २०१६ ते २८ फेब्रुवारी २०१८ या कालावधीत जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंचाकडे आलेल्या तक्रारींबाबत माहितीच्या अधिकारांतर्गत विचारणा केली होती. मंचाकडे किती तक्रारी आल्या, किती तक्रारी सोडविण्यात आल्या, ग्राहकांच्या बाजूने किती निकाल लागले, सर्वात जास्त तक्रारी कुणाविरोधात होत्या, इत्यादींबाबत त्यांनी प्रश्न विचारले होते. प्राप्त माहितीनुसार, या २६ महिन्यांच्या कालावधीत मंचात १६०४ तक्रारी दाखल करण्यात आल्या. यातील सर्वच तक्रारींचा निपटारा करण्यात आला. सर्वात जास्त तक्रारी बिल्डर्सविरोधात आल्या. १० ते २० लाखापर्यंत रकमेच्याफसवणुकीबाबत बिल्डर्सविरोधात ३०३ तक्रारी आल्या.दरम्यान, ग्राहक मंचने विविध अशा २७ प्रकरणांमध्ये २ लाख ९० हजार रुपयांचा दंड ठोठावला. तर या कालावधीत मंचकडे ४ लाख ६० हजार ३०० रुपयांचा महसूल जमा झाला.६६ टक्के तक्रारींचा निकाल ग्राहकांच्या बाजूनेया कालावधीत निपटारा झालेल्या तक्रारींमध्ये ग्राहकांच्या बाजूने निकाल लागण्याचे प्रमाण अधिक आहे. ७६९ प्रकरणांत ग्राहकांच्या बाजूने निकाल लागला तर २९७ प्रकरणांत ग्राहकांच्या विरोधात निकाल गेला.वर्षनिहाय तक्रारीवर्ष                          तक्रारी२०१६                     ७९९२०१७                    ६१७२०१८                     (फेब्रुवारीपर्यंत) १८८

टॅग्स :Homeघरconsumerग्राहक