दागिन्यांसह राेख रक्कम पळविली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 2, 2020 04:10 IST2020-12-02T04:10:51+5:302020-12-02T04:10:51+5:30
नरखेड : चाेरट्याने घरफाेडी करीत घरातील राेख रक्कम व साेन्याचांदीचे दागिने असा एकूण १ लाख १२ हजार रुपयांचा मुद्देमाल ...

दागिन्यांसह राेख रक्कम पळविली
नरखेड : चाेरट्याने घरफाेडी करीत घरातील राेख रक्कम व साेन्याचांदीचे दागिने असा एकूण १ लाख १२ हजार रुपयांचा मुद्देमाल चाेरून नेला. ही घटना नरखेड पाेलीस ठाण्याच्या हद्दीतील माेहगाव (भदाडे) येथे शनिवारी (दि. २८) दुपारी घडली.
माधेराव जागाेजी घटे (५५, रा. माेहगाव भदाडे, ता. नरखेड) हे कुटुंबीयांसह शेतात गेले हाेते. दरम्यान, घरी कुणीही नसल्याचे पाहून चाेरट्याने दाराची कडी ताेडून आत प्रवेश केला. यात त्याने कपाटातील ७२ हजार रुपयांचे साेन्याचांदीचे दागिने आणि ४० हजार रुपये राेख असा एकूण १ लाख १२ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल लंपास केला. सायंकाळी परत आल्यावर घरी चाेरी झाल्याचे लक्षात येताच माधेराव घटे यांनी पाेलिसात तक्रार दाखल केली. याप्रकरणी नरखेड पाेलिसांनी अज्ञात चाेरट्याविरुद्ध भादंवि ३७९ अन्वये गुन्हा नाेंदविला असून, या घटनेचा पुढील तपास पाेलीस उपनिरीक्षक खुटेमाटे करीत आहेत.