शहरं
Join us  
Trending Stories
1
फ्लिपकार्ट बिग बिलिअन डेजचा मोठा स्कॅम! अनेकांनी आयफोन १६ ऑर्डर केले, कंपनीने अचानक रद्द केले...
2
“CM, DCM यांची दिल्लीत वट, अतिवृष्टीच्या नुकसानभरपाईचा प्रस्ताव केंद्राला पाठवा”: वडेट्टीवार
3
"फरहानच्या AK47 वर अभिषेक-गिलचं 'ब्रह्मास्त्र' पडलं भारी.."; पाकिस्तानी क्रिकेटरनेच सुनावलं
4
“राज्यातील रस्त्यांच्या देखभाल-दुरुस्तीसाठी १२९६.०५ कोटींचा निधी”: शिवेंद्रसिंहराजे भोसले
5
National Film Award: पांढरे केस, गॉगल आणि सूटबूट! राष्ट्रीय पुरस्कारासाठी शाहरुखचा लूक, 'त्या' कृतीने जिंकली मनं
6
PAK vs SL : 'डबल पंजा पॅटर्न'मुळे लंकेचा पेपर सोपा! पाकला मात्र नापास होण्याचा धोका!
7
भरधाव ट्रकमागे दुचाकीस्वाराचा थरार, जीवघेणा स्टंट पाहून तुमच्याही अंगावर येईल शहारा! VIDEO व्हायरल
8
शेअर बाजार लाल निशाणीवर बंद; तरीही Axis बँकेसह 'या' स्टॉक्सनी घेतली जोरदार झेप!
9
सूर्य नक्षत्र परिवर्तन २०२५: २७ सप्टेंबरला सूर्य बदलणार नक्षत्र आणि 'या' ७ राशींचे भाग्य; बाकी राशींचे काय?
10
71st National Awards : 'श्यामची आई' ठरला सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपट, महाराष्ट्राची शान नऊवारी साडीत स्वीकारला पुरस्कार!
11
बायकोने मोबाईल मागितला, नवऱ्याने नाही दिला; संतापलेल्या पत्नीने मग घरातला चाकू घेतला अन्...
12
सरकारी नोकऱ्यांसाठी वयोमर्यादा शिथील करावी, काश्मिरी हिंदूंची मागणी; काय म्हणालं सर्वोच्च न्यायालय?
13
कंपनीचं एक स्पष्टीकरण आणि ₹३,४०० नं वाढली शेअरची किंमत; रचला इतिहास, भाव विक्रमी उच्चांकावर
14
'तो' वाद जीवावर बेतला! अवघ्या २० रुपयांसाठी काँग्रेस नेत्याच्या भावाची गोळ्या झाडून हत्या
15
Solapur: 'भैय्याला आधी काढा.. तो आत अडकला आहे'; भावाचा मृत्यू, बहिणीचा आक्रोश; मृतदेहच सापडला
16
रस्त्यांवरील खड्ड्यांबाबत प्रश्न विचारताच कर्नाटकचे उपमुख्यमंत्री संतापले, म्हणाले पंतप्रधानांच्यां निवासस्थानाबाहेरही...  
17
पोस्ट ऑफिसच्या 'या' योजनेत फक्त व्याजातूनच ४.५ लाखांची कमाई; सोबत टॅक्समध्येही मिळतेय सूट
18
अभूतपूर्व परिस्थितीत तातडीच्या मदतीसह कायमस्वरुपी मदतीची गरज; अन्यथा शेती मोठ्या समस्येत - शरद पवार
19
Food: भरपूर गर असलेले सीताफळ कसे निवडावे? कच्चे फळ निवडल्यास काय असतो धोका?
20
सरकारी कर्मचारी आणि पेन्शधारकांना मोठी दिवाळी भेट! पगारात होणारी इतकी वाढ

इन्स्टाग्रामवर चॅटिंग करून वाढवली ओळख आणि बोलावून केला बलात्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 17, 2021 11:26 IST

Nagpur News राहुलचे इन्स्टाग्रामवर छत्तीसगडमधील कोरबा जिल्ह्यातील कटघोरा येथील १७ वर्षाच्या विद्यासोबत (बदललेले नाव) ओळख झाली. काही दिवसानंतर राहुलने विद्याला बिलासपूरला बोलावले. तेथे राहुलने तिच्यासोबत शारीरिक संबंध प्रस्थापित केले.

ठळक मुद्दे अल्पवयीन मुलीचे अपहरण

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : छत्तीसगडमधील कोरबा जिल्ह्यातील कटघोरा येथील १७ वर्षांची मुलगी इन्स्टाग्रामवर मध्य प्रदेशातील नुराबाद जि. मुरैना येथील २० वर्षाच्या युवकाच्या संपर्कात आली. चॅटिंग करीत असताना त्यांचे सुत जुळले. युवकाने तिला बिलासपूरला बोलावून तिच्यावर बलात्कार केला. दोघेही राहुलच्या भावासोबत गोंडवाना एक्स्प्रेसने ग्वाल्हेरला जात असताना आरपीएफच्या जवानांनी त्यांना अटक करून नागपूर लोहमार्ग पोलिसांच्या स्वाधीन केले. सोशल मीडियाचा दुरुपयोग करून पुन्हा एक अल्पवयीन मुलगी शोषणाची बळी ठरल्याचे या घटनेवरून स्पष्ट झाले आहे.राहुल ऊर्फ सागर बाथम (२०) रा. नुराबाद जि. मुरैना, मध्य प्रदेश आणि शैलेंद्र देवीराम बाथम (२१) रा. माधवनगर, मध्य प्रदेश हे दोघेही मामेभाऊ आहेत. राहुलचे इन्स्टाग्रामवर छत्तीसगडमधील कोरबा जिल्ह्यातील कटघोरा येथील १७ वर्षाच्या विद्यासोबत (बदललेले नाव) ओळख झाली. ते नियमित चॅटिंग करू लागले. काही दिवसातच त्यांच्यात प्रेमसंबंध निर्माण झाले. काही दिवसानंतर राहुलने विद्याला बिलासपूरला बोलावले. तेथे विद्याच्या गावातील मिंटो नावाचा युवक कॉलेजमध्ये शिक्षण घेतो. विद्याच्या ओळखीने राहुल, त्याचा भाऊ मिंटोच्या खोलीवर दोन दिवस थांबले. तेथे राहुलने तिच्यासोबत शारीरिक संबंध प्रस्थापित केले.

त्यानंतर राहुल, त्याचा भाऊ आणि विद्या ग्वाल्हेरला निघाले होते. ते रेल्वेगाडी क्रमांक ०४०७९ गोंडवाना एक्स्प्रेसच्या कोच बी-४, बर्थ ५७, ६०, ६३ वरून प्रवास करीत होते. भंडारा ते नागपूर प्रवासात दक्षिण पूर्व मध्य रेल्वेच्या नागपूर विभागातील रेल्वे सुरक्षा दलाचे उपनिरीक्षक विनेक मेश्राम आणि आरपीएफ जवानांना त्यांच्यावर शंका आली. त्यांनी चौकशी केली असता राहुल आणि त्याच्या भावाने उडवाउडवीची उत्तरे दिली. परंतु अधिक चौकशीनंतर त्यांनी घरून पळून जात असल्याची कबुली दिली. मुलगी अल्पवयीन असल्यामुळे आरपीएफ जवानांनी नागपुरात तिघांनाही रेल्वे चाईल्ड लाईनच्या सुपूर्द केले.

रेल्वे चाईल्ड लाईनच्या प्रतिनिधींनी तिघांनाही लोहमार्ग पोलिसांच्या स्वाधीन केले. लोहमार्ग पोलिसांनी विद्याची वैद्यकीय तपासणी करून अपहरण, बलात्कार आणि पोक्सोअंतर्गत गुन्हा दाखल केला. ही घटना बिलासपूर पोलिसांच्या हद्दीत घडल्यामुळे हे प्रकरण बिलासपूर पोलिसांकडे हस्तांतरित करण्यात आले. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीcyber crimeसायबर क्राइम