मेरू छत्री समाजाकरिता समाजभवन उभारा

By Admin | Updated: August 26, 2014 01:01 IST2014-08-26T01:01:59+5:302014-08-26T01:01:59+5:30

शहरात मेरू छत्री समाजाचे समाजभवन बांधण्यात यावे, अशा मागणीचे निवेदन नगरसेवक डॉ़ परिणय फुके यांच्या नेतृत्वातील शिष्टमंडळाने केंद्रीय परिवहन व जहाजबांधणी मंत्री नितीन गडकरी यांना दिले.

Raise a Samaj Bhavana for Meru Chhattri Samaj | मेरू छत्री समाजाकरिता समाजभवन उभारा

मेरू छत्री समाजाकरिता समाजभवन उभारा

गडकरी यांना निवेदन : फुकेंच्या नेतृत्वात शिष्टमंडळ भेटले
नागपूर : शहरात मेरू छत्री समाजाचे समाजभवन बांधण्यात यावे, अशा मागणीचे निवेदन नगरसेवक डॉ़ परिणय फुके यांच्या नेतृत्वातील शिष्टमंडळाने केंद्रीय परिवहन व जहाजबांधणी मंत्री नितीन गडकरी यांना दिले.
या वेळी फुके यांनी सांगितले की, शहरात छत्री समाजाची लोकसंख्या ही ६० हजाराच्या जवळपास आहे. या समाजाचा समावेश केंद्र व राज्य सरकारने अनुसूचित जमातीमध्ये केला आहे़ या समाजाची आर्थिक, सामाजिक व शैक्षणिक परिस्थिती अतिशय विषम असल्याने, या समाजाचा उद्घार झालेला नाही़ या समाजाचे वास्तव्य हे मानकापूर, झिंगाबाई टाकळी, कोराडी रोड या परिसरात जास्त आहे़ या समाजाची आर्थिक परिस्थिती नाजूक असल्याने या समाजाला सांस्कृतिक, सामाजिक व शैक्षणिक कार्यक्रम घेण्यास त्रास होतो. त्यामुळे एक समाजभवन बांधून द्यावे,अशी मागणी यावेळी गडकरी यांच्याकडे करण्यात आली.
केंद्रीय मंत्री गडकरी यांनी निवेदन स्वीकारून या मागणीचा सकारात्मक विचार करण्याची मौखिक व लेखी सूचना नासुप्रचे सभापती प्रवीण दराडे यांना केली. शिष्टमंडळात छत्री समाजाचे अध्यक्ष मधुकर सोमलवार, नागेश्वर तालेवार, सुरेश कायरवार, शेखर मंधापूरवार, अशोक मंथनवार, मदन तालेवार, नरसिंगराव मंथापूरवार, नागेश्वर मारशेट्टीवार, मुकेश मारशेट्टीवार, अनिता मारशेट्टीवार, शारदा तालेवार, संध्या तालेवार, रेखा सोमलवार, ज्ञानेश्वर काटकवार, कृष्णा काटकवार, रमेश कल्लमवार आदींचा समावेश होता. (प्रतिनिधी)

Web Title: Raise a Samaj Bhavana for Meru Chhattri Samaj

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.