शहरं
Join us  
Trending Stories
1
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
2
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
3
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
4
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
5
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
6
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
7
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
8
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
9
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
10
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
11
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
12
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
13
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
14
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
15
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
16
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
17
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
18
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
19
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
20
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
Daily Top 2Weekly Top 5

मेट्रो पुलावरून पावसाच्या पाण्याची गळती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 17, 2020 00:08 IST

अजनी चौकातून सोनेगाव पोलीस ठाण्याकडे जाणाºया डबलडेकर पुलावरून पावसाचे पाणी जास्त प्रमाणात रस्त्यावर गळत असल्याने नागरिकांना त्रास होत आहे.

ठळक मुद्देड्रेनेज सिस्टिमचे बांधकाम अपूर्ण : वर्धा मार्गावरून जाणाऱ्या नागरिकांना त्रास

लोकमत  न्यूज  नेटवर्कनागपूर : अजनी चौकातून सोनेगाव पोलीस ठाण्याकडे जाणाºया डबलडेकर पुलावरून पावसाचे पाणी जास्त प्रमाणात रस्त्यावर गळत असल्याने नागरिकांना त्रास होत आहे. रविवारी आणि सोमवारी आलेल्या मुसळधार पावसामुळे महामेट्रोच्या कामाची पोल खुलली आहे. लॉकडाऊनच्या काळात बांधकाम बंद होते. ड्रेनेज सिस्टिमचे काम अपूर्ण असल्यामुळेच पाण्याचा धारा रस्त्यावर पडत असल्याची माहिती सूत्रांनी दिली.वर्धा रोडवरील डबलडेकर पूल आॅगस्टमध्ये वाहतुकीसाठी खुला होणार आहे. अनलॉकमध्ये पुलाचे बांधकाम सुरू झाले आहे. पण कामाला अजूनही वेग आलेला नाही. पुलावरून वाहतूक केव्हा सुरू होणार, यावरही अनिश्चितता आहे. बांधकामासोबतच पुलावरून पावसाचे पाणी वाहून नेणाऱ्या ड्रेनेज सिस्टिमचे कामही अपूर्ण आहे. पावसाळ्यात नागरिकांना त्रास होणार नाही, याकडे महामेट्रोला लक्ष देण्याची गरज आहे. या कामासाठी वर्धा रोडवर अनेक महिने वाहतूक बंद होती. महामेट्रोच्या कामाला नागरिकांनीही सहकार्य केले. पण महिन्याचे काम वर्षावर जात असल्याने नागरिकांमध्ये नाराजी आहे. मेट्रोच्या अन्य पुलावरूनही रस्त्यावर पाण्याच्या धारा वाहत असल्याच्या घटना रविवारी आणि सोमवारी घडल्या आहेत. प्रशासनाने याकडे लक्ष द्यावे, अशी नागरिकांची मागणी आहे.पाईपलाईनचे काम लवकरच पूर्ण होणारवर्धा मार्गावरील डबलडेकर पुलांतर्गत उज्ज्वलनगर येथील पुलाचे काम लॉकडाऊनमुळे अपूर्ण आहे. अनलॉकमध्ये काम सुरू झाले आहे. काम पूर्ण झाल्यानंतर पावसाचे पाणी पुलावरून थेट पाईपलाईनद्वारे वाहून जाईल. रस्त्यावर पाणी पडणार नाही. कामाच्या पूर्णत्वानंतर डबलडेकर पूल ऑगस्टमध्ये वाहतुकीसाठी खुला होणार आहे.अखिलेश हळवे, उपमहाव्यवस्थापक (कॉर्पोरेट कम्युनिकेशन)

टॅग्स :Metroमेट्रोRainपाऊस