भारतीय रेल्वेत रेन वॉटर हार्वेस्टिंग, सोलर एनर्जीला प्राधान्य
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 6, 2021 04:06 IST2021-06-06T04:06:40+5:302021-06-06T04:06:40+5:30
नागपूर : भारतीय रेल्वेत पर्यावरण संतुलनासाठी पाऊल उचलण्यात आले असून रेल्वेस्थानकांवर रेन वॉटर हार्वेस्टिंग आणि सोलर एनर्जी सिस्टीमसह पाण्याचे ...

भारतीय रेल्वेत रेन वॉटर हार्वेस्टिंग, सोलर एनर्जीला प्राधान्य
नागपूर : भारतीय रेल्वेत पर्यावरण संतुलनासाठी पाऊल उचलण्यात आले असून रेल्वेस्थानकांवर रेन वॉटर हार्वेस्टिंग आणि सोलर एनर्जी सिस्टीमसह पाण्याचे पुनर्शुद्धीकरण करण्यात येत आहे.
भारतीय रेल्वेत हरित क्रांती सुरू करण्यासाठी जुलै २०१६ मध्ये भारतीय रेल्वे आणि भारतीय उद्योग संस्थेमध्ये सामंजस्य करार करण्यात आला. त्यानुसार ३९ रेल्वे कारखाने, ८ लोकोशेड आणि स्टोअर डेपोला ग्रिनको प्रमाणपत्र देण्यात आले आहे. नागपुरातही डीआरएम कार्यालयावर सोलर एनर्जी सिस्टीम लावण्यात आली असून दरवर्षी विजेची मोठी बचत होत आहे. याशिवाय रेन वॉटर हार्वेस्टिंग सिस्टीम लावण्यात आली असून वापरलेल्या पाण्याचा पुनर्वापर करून त्यापासून रेल्वेगाड्या धुण्यात येत आहेत. आतापर्यंत १९ रेल्वेस्थानकांना ग्रीन सर्टिफिकेट मिळाले असून भारतीय रेल्वेत ६०० पेक्षा अधिक रेल्वेस्थानकांना आयएसओ १४००१ प्रमाणपत्र मिळाले आहे.
...........