शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

रेन वॉटर हार्वेस्टिंग; नागपुरातील रामदासपेठेतील नागरिकांचा पुढाकार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 30, 2018 12:48 IST

रामदासपेठ येथील जुन्या गृह प्रकल्पांत राहणाऱ्या नागरिकांनी स्वत:हून रेन वॉटर हार्वेस्टिंगसाठी पुढाकार घेतला आहे. रामदासपेठ प्लॉट ओनर्स व रेसिडेंटस् असोसिएशनच्या नेतृत्वाखाली १२० गृह प्रकल्पांत रेन वॉटर हार्वेस्टिंग सिस्टीम लावण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.

ठळक मुद्दे १२० गृह प्रकल्पांचा समावेश करण्याचा प्रयत्न

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : वेगाने घटत असलेली भूजल पातळी व सतत वाढत असलेले जल प्रदूषण या बाबी लक्षात घेता रेन वॉटर हार्वेस्टिंग (पावसाचे पाणी वाचविणे) अत्यावश्यक झाले आहे. त्यामुळे महापालिकेने नवीन गृह प्रकल्पांमध्ये रेन वॉटर हार्वेस्टिंग सिस्टीम लावणे बंधनकारक केले आहे. असे असले तरी रामदासपेठ येथील जुन्या गृह प्रकल्पांत राहणाऱ्या नागरिकांनी स्वत:हून रेन वॉटर हार्वेस्टिंगसाठी पुढाकार घेतला आहे. रामदासपेठ प्लॉट ओनर्स व रेसिडेंटस् असोसिएशनच्या नेतृत्वाखाली १२० गृह प्रकल्पांत रेन वॉटर हार्वेस्टिंग सिस्टीम लावण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.असोसिएशनचे सचिव सीए जुल्फेश शाह यांनी ‘लोकमत’ला ही माहिती दिली. रेन वॉटर हार्वेस्टिंग सिस्टीम लावल्यानंतर पावसाच्या पाण्याचा उपयोग करता येईल. त्यामुळे वीज व पाणी बिलाची बचत होईल. तसेच, मनपाकडून मालमत्ता करात सूट मिळेल. प्रत्येक प्रकल्पात ही सिस्टीम लावण्यासाठी सुमारे एक लाख रुपये खर्च येणार आहे.या उपक्रमासाठी मनपाचे सहकार्य घेतले जाणार आहे. नागरिकांनी उपक्रमात सहभागी व्हावे याकरिता प्रतिज्ञापत्र तयार केले जात आहे. तसेच, पुढील तीन महिने जनजागृतीपर कार्यक्रम घेतले जाणार आहेत. आगामी पावसाळ्यात रामदासपेठला शहरातील आदर्श रेन वॉटर हार्वेस्टिंग सिस्टीमचे क्षेत्र म्हणून ओळख निर्माण करून देण्याचे लक्ष्य आहे.

८ एप्रिल रोजी सभारेन वॉटर हार्वेस्टिंगसंदर्भात ८ एप्रिल रोजी सकाळी ८.३० वाजता रामदासपेठेतील दगडी पार्क येथे सभा आयोजित करण्यात आली आहे. सभेत महापौर नंदा जिचकार, जलप्रदाय समितीचे सभापती विजय झलके, नगरसेवक निशांत गांधी, उज्ज्वला शर्मा, सुनील हिरणवार प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहतील. याप्रसंगी रेन वॉटर हार्वेस्टिंग करणाऱ्याला मनपाद्वारे मिळणाऱ्या लाभाची माहिती दिली जाईल. असोसिएशनचे अध्यक्ष दिलीप सराफ, सचिव सीए जुल्फेश शाह व प्रकाश सोनी यशस्वीतेसाठी परिश्रम घेत आहेत.

टॅग्स :Rainपाऊस