पावसाची दांडी, शेतकरी चिंतित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 7, 2021 04:10 IST2021-07-07T04:10:08+5:302021-07-07T04:10:08+5:30

लाेकमत न्यूज नेटवर्क काेंढाळी : यंदाच्या माेसमात चांगला पाऊस पडणार, अशी शक्यता हवामान खात्याने वर्तविल्यानंतर काटाेल तालुक्यातील शेतकऱ्यांनी यावर्षी ...

Rainstorm, farmers worried | पावसाची दांडी, शेतकरी चिंतित

पावसाची दांडी, शेतकरी चिंतित

लाेकमत न्यूज नेटवर्क

काेंढाळी : यंदाच्या माेसमात चांगला पाऊस पडणार, अशी शक्यता हवामान खात्याने वर्तविल्यानंतर काटाेल तालुक्यातील शेतकऱ्यांनी यावर्षी मृग नक्षत्रातच पेरणी केली. परंतु मृग गेला व आर्द्रा नक्षत्र संपण्याच्या मार्गावर असताना पाऊस बेपत्ता झाला आहे. यामुळे शेतकरी चिंताग्रस्त झाला असून, तालुक्यात झालेल्या ९६ टक्के पेरण्या धाेक्यात आहेत.

काटाेल तालुक्यात पेरणीयाेग्य व दमदार पाऊस झाल्याने बहुतांश शेतकऱ्यांनी पेरणीची कामे उरकली. यावर्षी साेयाबीन बियाण्यांची टंचाई भासत असताना शेतकऱ्यांनी १० ते १२ हजार रुपये प्रतिक्विंटल दराने साेयाबीन बियाणे खरेदी करीत पेरणी केली. तालुका कृषी अधिकारी सुरेश कन्नाके यांच्या माहितीनुसार काटाेल तालुक्यातील ८३०००४.७५ हेक्टर भाैगाेलिक क्षेत्र असून, ५२८१३.२० हेक्टर क्षेत्र पिकाखाली आहे. तालुक्यातील एकूण सहा मंडळांतर्गत ५ जूनपर्यंत काटाेल ९२४ हेक्टर, येनवा १२१०, पारडसिंगा ९०९, मेटपांजरा ७५२, रिधाेरा ११६९, काेंढाळी ११६० असे एकूण ६,१२४ हेक्टर क्षेत्रात तूर पीक, ११,१२९ हेक्टर क्षेत्रात साेयाबीन तसेच २९,१९४ हेक्टरमध्ये कपाशी असे एकूण तालुक्यात ९६ टक्के पेरणी पूर्ण झाली असल्याची माहिती त्यांनी दिली.

गेल्या १० ते १२ दिवसापासून तालुक्यात पावसाने दडी मारली असून कडक उन्ह तापत आहे. यामुळे जमिनीतील ओलावा नष्ट हाेऊन पिकांनी माना टाकायला सुरुवात केली आहे. काही शेतकऱ्यांनी पिकांना वाचविण्यासाठी तुषार सिंचन सुरू केले आहे. परंतु विहिरीत पुरेसे पाणी नसल्याने पाणी देणे कठीण झाले आहे. तालुक्यात दाेन-तीन दिवस पाऊस न पडल्यास संपूर्ण पेरण्या धाेक्यात येण्याची शक्यता निर्माण झाली असल्याने शेतकरी चिंतित आहेत.

....

सरासरी १३७.०१ मिमी पाऊस

काटाेल तालुक्यातील सहा सर्कलनिहाय ५ जूनपर्यंत सरासरी १३७.०१ मिलिमीटर पावसाची नाेंद करण्यात आल्याची माहिती तहसीलदार अजय चरडे यांनी दिली. यात काटाेल सर्कलमध्ये १८७.९ मिलिमीटर, काेंढाळी १५३.० मिमी, मेटपांजरा ६६.० मिमी, येनवा १३१.९ मिमी, पारडसिंगा १५६.५ मिमी तर रिधाेरा सर्कलमध्ये १२६.८ मिलिमीटर पावसाची नाेंद झाली असून, तालुक्यात एकूण १३७.०१ मिलिमीटर इतका पाऊस पडला आहे.

Web Title: Rainstorm, farmers worried

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.