पावसामुळे बाजार समितीच्या यार्डात दाणादाण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 20, 2021 04:20 IST2021-02-20T04:20:36+5:302021-02-20T04:20:36+5:30
भिवापूर : भिवापूर तालुक्यात दुपारच्या सुमारास पावसाने दमदार हजेरी लावली. त्यामुळे बाजार समितीच्या यार्डात तारांबळ उडाली. यावेळी यार्डात शेतमाल ...

पावसामुळे बाजार समितीच्या यार्डात दाणादाण
भिवापूर : भिवापूर तालुक्यात दुपारच्या सुमारास पावसाने दमदार हजेरी लावली. त्यामुळे बाजार समितीच्या यार्डात तारांबळ उडाली. यावेळी यार्डात शेतमाल उघड्यावर असल्यामुळे सर्वत्र दाणदाण झाली होती. शिवाय शेतातील पिकांचे नुकसान होण्याची शक्यता असल्यामुळे शेतकरी चिंतित आहेत.
गुरुवारी दुपारी २ वाजताच्या सुमारास शहरात व तालुक्यातील काही भागात अवकाळी पाऊस बरसला. सलग तासभर दमदार पाऊस झाला. गत दोन दिवसापासून ढगाळ वातावरण आहे. शिवाय हवामान खात्याने पावसाची शक्यता वर्तविल्यामुळे बाजार समितीच्या यार्डातील बहुतांश शेतमाल टिनाच्या शेडमध्ये सुरक्षित झाकलेला होता. मात्र कापूस व धानाची काही पोती खुल्या आवारात होती. दरम्यान पाऊस येताच यार्डातील व्यापारी, कर्मचारी व शेतकरी बांधवांची धावपळ सुरू झाली. लागलीच सावरासावर करीत उघड्यावरील कापूस ताडपत्रीने झाकण्यात आला. त्यामुळे नुकसान झाले नाही. मात्र यार्डात चिखल झाल्याने सर्वत्र दाणादाण झाली होती. गत दोन दिवसापासून ढगाळ वातावरणामुळे शेतातील गहू, हरभरा, मिरची आदी पिके नुकसानीच्या छायेत होती. अशातच अवकाळी पावसामुळे ही पिके आता नुकसानीच्या तावडीत सापडली आहेत. मिरची सातऱ्यांनासुद्धा थोडीफार का होईना नुकसानीची झळ बसली आहे.