शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी 'राज'कीय घडामोड! देवेंद्र फडणवीस - राज ठाकरे यांची ताज हॉटेलमध्ये बैठक? चर्चांना उधाण
2
दोन मुलांची आई १७ वर्षांच्या तरुणाच्या प्रेमात पडली, वर्ष झालं पिच्छा सोडेना, अखेर तरुणाने 'असा' शिकवला धडा! 
3
"ऑपरेशन सिंदूर हे लहान मुलांच्या व्हिडीओ गेमसारखे" नाना पटोलेंचं वक्तव्य
4
खळबळजनक! ४ लाख फॉलोअर्स असलेल्या महिला इन्फ्लुएन्सरचा कारमध्ये सापडला मृतदेह
5
"पाकिस्तान्यांचा नानांना भलताच कळवळा?, तुमचा आणि तुमच्या मालकाचा डीएनए एकच...देशद्रोह"
6
Astro Tips: शुक्र केतू युती सुखाने जगू देत नाही; आयुष्यात होते मोठे नुकसान!
7
पाकिस्तानचा हा कट्टर शत्रू तयार करतोय आत्मघातकी ड्रोनची फौज; इस्लामाबाद असो वा कराची, क्षणात होईल माती-माती!
8
'आता आणखी खेळाडू निवृत्त होतील...'; वर्ल्डकप विजेत्या कर्णधाराने केला धक्कादायक दावा
9
"लिव्ह इनमध्ये राहण्याचा खूप फायदा", मराठी अभिनेत्रीने मांडले विचार; म्हणाली, "आपले खरे रंग..."
10
आरोग्य विमा घेताना फसगत नको! 'हे' ६ प्रश्न विचाराच, अन्यथा पैसे वाया जातील!
11
लग्नाच्या ३ वर्षांनंतर आलिया भटने नावात केला मोठा बदल; हॉटेलमधील 'त्या' फोटोमुळे चर्चांना उधाण
12
डिसेंबरपासून बंद पडलंय 'या' शेअरचं ट्रेडिंग; किंमत फक्त १० रुपये, आता समोर आली मोठी अपडेट 
13
IND vs ENG : टीम इंडियातील या स्टार खेळाडूसाठी गांगुलीनं घेतला BCCI निवडकर्त्यांशी पंगा! म्हणाला...
14
पंतप्रधान मोदींच्या दौऱ्यापूर्वी कॅनडात खलिस्तानवाद्यांवर जोरदार कारवाई, अनेकांना अटक...
15
Raj Kushwaha : "सोनम वयाने मोठी, बॉस होती, राज फक्त नोकर"; आईने घेतली लेकाची बाजू, म्हणाली...
16
विशेष लेख: मोठ्या पवारांची भाजपच्या दारावर टकटक?
17
'PM मोदींनी आपला हट्टीपणा सोडावा', असीम मुनीरच्या अमेरिका दौऱ्यावरुन काँग्रेसची टीका
18
आजचा अग्रलेख - किती मुले केव्हा? की नकोच?
19
राज कुशवाह तर मोहरा, सोनमचं खरं प्रेम कुणीतरी दुसरंच...? राजा रघुवंशी प्रकरणात नवा 'ट्विस्ट'

नागपुरात  पावसाचा ‘बॅकलॉग’ झाला दूर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 1, 2019 00:58 IST

मागील आठवड्यापर्यंत पावसाने पाठ फिरविल्यामुळे चिंतातूर झालेल्या नागपूरकरांना आता दिलासा मिळाला आहे. सहा दिवसात शहरात २६२.२ मिमी पावसाची नोंद झाली असून सरासरीजवळ आकडेवारी आली आहे. हवामान खात्याच्या आकडेवारीनुसार ३१ जुलैपर्यंत नागपूर जिल्ह्यात सरासरीच्या ९९ टक्के पाऊस पडलेला आहे.

ठळक मुद्देसहा दिवसांत २६२ मिमी पावसाची नोंद : सरासरीच्या ९९ टक्के पाऊस

लोकमत  न्यूज  नेटवर्कनागपूर : मागील आठवड्यापर्यंत पावसाने पाठ फिरविल्यामुळे चिंतातूर झालेल्या नागपूरकरांना आता दिलासा मिळाला आहे. सहा दिवसात शहरात २६२.२ मिमी पावसाची नोंद झाली असून सरासरीजवळ आकडेवारी आली आहे. हवामान खात्याच्या आकडेवारीनुसार ३१ जुलैपर्यंत नागपूर जिल्ह्यात सरासरीच्या ९९ टक्के पाऊस पडलेला आहे.१ जून ते ३१ जुलै या कालावधीत नागपूर जिल्ह्यात सरासरी ५१९.९८ मिमी पाऊस पडतो. यंदा १ जून ते ३१ जुलै या काळात सरासरीच्या ९९ टक्के पाऊस झाला आहे. तर विदर्भात सरासरीच्या ९० टक्के पाऊस पडला आहे. मागील सहा दिवसात पावसाचे प्रमाण वाढले असले तरी शहराला पाणीपुरवठा करणारा तोतलाडोह तलाव, नवेगाव खैरी येथील जलस्तर वाढलेला नाही. यामुळे शहरात पाणीकपात अद्यापही सुरू आहे.मंगळवारी दिवसभर शहरात पाऊस होता तर बुधवारी पावसाची तीव्रता कमी होती. नागपुरात सकाळी ८.३० पर्यंत ८७.१ मिमी पावसाची नोंद झाली. पुढील दोन दिवस पाऊस कायम राहण्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे. बुधवारी आर्द्रता १०० ते ९६ टक्के इतकी होती तर कमाल तापमान २५ अंश सेल्सिअस इतके नोंदविण्यात आले.उमरेड, भिवापूरमध्ये अतिवृष्टीनागपूर विभागात गेल्या २४ तासात सरासरी ५५.५८ मिमी पावसाची नोंद झाली असून भंडारा जिल्ह्यातील पवनी तालुक्यात सर्वाधिक १७५ मिमी पावसाची नोंद झाली. नागपूर जिल्ह्यातील भिवापूर तालुक्यात १३९.१० मिमी तर उमरेड तालुक्यात १३५.३० मिमी पावसाची नोंद झाली. कुही (९७.४ मिमी), मौदा (८५ मिमी)व हिंगणा (६७.८ मिमी), कामठी (५९.४ मिमी) पावसाची नोंद झाली.

टॅग्स :Rainपाऊसnagpurनागपूर