जिल्ह्यात ठिकठिकाणी पाऊस

By Admin | Updated: June 9, 2017 01:18 IST2017-06-09T01:17:32+5:302017-06-09T01:18:31+5:30

जिल्ह्यात ठिकठिकाणी पाऊस

Rainfall everywhere in the district | जिल्ह्यात ठिकठिकाणी पाऊस

जिल्ह्यात ठिकठिकाणी पाऊस

लोकमत न्यूज नेटवर्क
नाशिक : जिल्ह्यात पावसाने ठिकठिकाणी हजेरी लावल्याने बळीराजा सुखावला आहे.
येवला येथे मृग नक्षत्राच्या हलक्या सरींनी तालुक्याच्या पूर्व व पश्चिम भागात पावसाची सुरु वात झाली. मात्र शहरासह मध्य भागात अजूनही पावसाची प्रतीक्षा आहे.
दुपारी ३ वाजेनंतर पावसास हलक्या सरींनी सुरु वात झाली. त्यांनतर दिलेल्या उघडीपाने चिंतेत भर पडण्यास सुरु वात झाली. मागील वर्षा प्रमाणे मृग नक्षत्र कोरडेच जाते की काय, अशा चर्चेस सुरु वात झाली, परंतु हलक्या सरींनी पुन्हा समाधान दिसण्यास सुरु वात झाली आहे.
बळीराजा शेतीची कामे आटोपून चातकाप्रमाणे पावसाची वाट पाहत असतानाच मृग नक्षाच्या मुहूर्तावर मेघराजाने तालुक्याच्या पूर्व व पश्चिम भागात काही ठिकाणी तुरळक हजेरी लावली. पावसाचा लहान मुलांनी मनमुराद आनंद घेतला. या पावसाने शेतकऱ्यांच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत. परंतु येवला शहराचा १० किमी परिघाचा भाग नेहमी पावसापासून वंचित राहिल्याचा इतिहास आहे. यावर्षी हवामान विभागाने दिलेल्या अंदाजानुसार चांगल्या मान्सूची शक्यता असली तरी बळीराजा शेतीची कामे आटोपून पेरणीसाठी चातकाप्रमाणे मेघराजाची वाट पाहत आहे.
सकाळपासून ढगाळ वातावरण असतानाच दुपारी ४ वाजण्याच्या सुमारास अचानक रिमझिम पावसाला सुरु वात झाली. ग्रामीण भागात झालेल्या या रिमझिम मृगसरींचा आस्वाद बच्चे कंपनींनी मनमुराद लुटला. या पावसाने वातावरणात निर्माण झालेली प्रचंड उष्णतेची लाट ओसरून काही प्रमाणात थंडावा निर्माण झाला. यामुळे नागरिकांची उकाड्यापासून काही अंशी सुटका झाली आहे. पावसाच्या आगमन झाल्याने बळीराजाच्या खरीपाच्या पेरणीसाठी आशा पल्लवीत होऊन बियाणे व खते खरेदीसाठी तो सज्ज झाला आहे. जिल्ह्यात ठिकठिकाणी चांगल्या पावसाची नोंद झाली आहे. मात्र येवला शहरात पावसाने तुरळक हजेरी लावली आहे. पावसाळ्यात चांगला पाऊस पडावा अशी अपेक्षा यंदा बळीराजा करत आहे.
लासलगाव परिसरात
पावसाची दमदार सुरु वात
लासलगाव व परिसरात गुरूवारी दुपारनंतर दमदार पाऊस पडल्याने शेतकरी सुखावला आहे. लासलगाव व शहर परिसरात गुरूवारी पावसाने हजेरी लावली. पावसाची गरज असल्याने व मृग नक्षत्र सुरू झाल्यानंतर लागलीच दमदार पावसाने शेतात पाणी साचले. त्यामुळे शेतकरी व व्यापारी वर्गात आनंदाचे वातावरण आहे . पिक पेरणीसाठी जमीन चांगली ओलसर असावी लागते. पेरणीला पोषक वातावरण झाल्याने शेतकरी वर्गाच्या आशा पल्लवीत झाल्या आहे. दमदार पाऊस सुरू झाल्याने शेतात अनेक ठिकाणी पावसामुळे डबकी साचली होती. ग्रामीण भागांत पडलेला पाऊस खरीप हंगामाच्या तयारीला पोषक ठरणार आहे. जोरण परिसरात मुसळधार पाऊसबागलाण तालुक्यातील जोरण, विंचुरे, कंधाणा, निरपुर, वटार आदि ठिकाणी मुसळधार पाऊस झाला. सायंकाळी पाच वाजेच्या दरम्यान अचानक अलेलेल्या पावसाणे शेतकरी वर्गाची चांगलीच तारांबळ उडाली. गेल्या सात ते आठ दिवसांपासुन संपावर गेलेल्या शेतकऱ्यांची चांगलीच धावपळ झाली.

Web Title: Rainfall everywhere in the district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.