शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
2
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
3
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
4
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
5
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
6
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
7
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
8
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
9
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
10
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
11
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
12
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
13
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
14
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
15
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
16
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
17
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
18
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
19
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
20
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
Daily Top 2Weekly Top 5

नागपूर जिल्ह्यात वादळासह पाऊस; वीज पडून एकाचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 18, 2021 21:38 IST

Rain with storm सायंकाळी आलेल्या वादळ व पावसाने जिल्ह्यातील ग्रामीण भागात कहर केला. गुमगाव येथील एका शेळीपालकाचा वीज पडून मृत्यू झाला. काटोल तालुक्यातील गावांमधील घरांचे पत्रे आणि छप्पर वादळात उडाले. कोंढाळी तालुक्यालाही वादळासह पावसाने तडाखा दिला. नागपूर शहरासह अन्य तालुक्यांमध्येही वादळासह जोराचा पाऊस आल्याने आंब्याचे प्रचंड नुकसान झाले.

ठळक मुद्देकाटोल तालुक्यात घरांचे पत्र उडाले : कोंढाळीतही वादळाचा तडाखा, पुढचे दोन दिवस पावसाचा इशारा

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : सायंकाळी आलेल्या वादळ व पावसाने जिल्ह्यातील ग्रामीण भागात कहर केला. गुमगाव येथील एका शेळीपालकाचा वीज पडून मृत्यू झाला. काटोल तालुक्यातील गावांमधील घरांचे पत्रे आणि छप्पर वादळात उडाले. कोंढाळी तालुक्यालाही वादळासह पावसाने तडाखा दिला. नागपूर शहरासह अन्य तालुक्यांमध्येही वादळासह जोराचा पाऊस आल्याने आंब्याचे प्रचंड नुकसान झाले.

गुमगाव येथील वार्ताहराने दिलेल्या माहितीनुसार, सायंकाळी आलेल्या वादळ व पावसात तेथील वाहाब राज मोहम्मद शेटे (६३) यांचा वीज पडून मृत्यू झाला. कोतेवाडा शिवारात ते आपल्या शेळ्यांना चराईसाठी घेऊन गेले असता, सायंकाळी ५ वाजताच्या सुमारास जोरदार वादळ व गडगडाटासह झालेल्या पावसात ही घटना घडली. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा व मुलगी आहे. हेड कॉन्स्टेबल अरविंद घिये, विनोद देशमुख, मंगेश मापारी यांनी घटनास्थळी पोहोचून पंचनामा केला व उत्तरीय तपासणीसाठी हिंगणा ग्रामीण रुग्णालयात मृतदेह पाठविला.

काटोल तालुक्याला सायंकाळी वादळासह पावसाने जोरदार तडाखा दिला. अनेक घरांचे पत्रे उडाले. यामुळे गावकरी भयभीत झाले होते. वादळात झाडांच्या फांद्याही मोडून पडल्या. कोंढाळी तालुक्यातही वादळ व पावसाने घरांचे आणि आंब्याच्या बागांचे नुकसान केले. रामटेक, नरखेड तालुक्यातही वादळासह पावसाने हजेरी लावली. यामुळे आंब्याचे आणि भाजीपाला पिकांचे बरेच नुकसान झाले.

मंगळवारी नागपूरसह ग्रामीण भागात दुपारी कडक उन्ह पडले. तरीही उकाडा चांगलाच जाणवत होता. सायंकाळी वातावरण बदलले आणि वादळासह पावसाने हजेरी लावली. हवामान विभागाने नागपूरसह अन्य जिल्ह्यांमध्ये पुढचे दोन दिवस मेघगर्जनेसह पावसाचा इशारा दिला आहे. अन्य जिल्ह्यात हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस वर्तविला आहे. तर, नागपूर, भंडारा, गोंदिया, वर्धा, अमरावती, अकोला बुलडाणा येथे १९ आणि २० मे हे दोन दिवस विजांच्या गडगडाटासह पावसाची शक्यता वर्तविली आहे.

नागपूरकरांना उकाड्यावर पावसाची मात्रा

दोन दिवसांपासून उकाड्याने त्रस्त असलेल्या नागपूरकरांना मंगळवारी सायंकाळी पावसाने गारव्याची मात्रा दिली. सुमारे २० मिनिटे आलेल्या जोराच्या पावसामुळे वातावरण थंडावले. काही काळ जोराचा वाराही सुटला. मात्र नुकसानाचे वृत्त नाही. दिवसभराचे तापमान ४०.२ अंश सेल्सिअस नोंदविले गेले. आर्द्रता सकाळी ६९ टक्के होती, सायंकाळी आलेल्या पावसानंतर ९६ टक्के नोंदविली गेली.

चंद्रपूरचे तापमान सर्वाधिक

मंगळवारी सर्वाधिक तापमान चंद्रपूरचे ४१.२ अंश सेल्सिअस नोंदविण्यात आले. वाशिम आणि अमरावतीमध्ये ३७.६, बुलडाणा ३७.७, अकोला ३८.४, गडचिरोली ३८.६, यवतमाळ आणि गोंदियात ३९ तर वर्धा येथे ३९.२ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. गोंदियात मागील २४ तासात ३.६ मिली पाऊस पडला.

टॅग्स :RainपाऊसDeathमृत्यू