नागपुरात वादळी वाऱ्यासह पाऊस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 19, 2020 00:52 IST2020-04-19T00:51:30+5:302020-04-19T00:52:34+5:30
दिवसभराच्या उकाड्यानंतर शनिवारी रात्री नागपुरात विजांच्या कडकडाटासह वादळी पाऊस झाला. सुमारे अर्धा तास चाललेल्या वादळामुळे काही भागात झाडांच्या फांद्या तुटून पडल्या. रस्त्यावरील होर्डिंग्जही पडले.

नागपुरात वादळी वाऱ्यासह पाऊस
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : दिवसभराच्या उकाड्यानंतर शनिवारी रात्री नागपुरात विजांच्या कडकडाटासह वादळी पाऊस झाला. सुमारे अर्धा तास चाललेल्या वादळामुळे काही भागात झाडांच्या फांद्या तुटून पडल्या. रस्त्यावरील होर्डिंग्जही पडले.
पश्चिम नागपुरातील बऱ्याच वस्त्यांमधील वीजपुरवठा खंडित झाला होता. ग्रामीण भागातही वादळी पाऊस झाला. कोरोनाशी लढा देण्यासाठी दिवसरात्र प्रयत्न सुरू असताना या वादळी पावसामुळे प्रशासकीय यंत्रणेसमोर नवे अडथळे निर्माण होण्याची शक्यता आहे.