ओडिशा अपघातानंतर टीकेची धार बोथट करण्यासाठी रेल्वेकडून सुरक्षेच्या खर्चाचा गाजावाजा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 7, 2023 08:00 IST2023-06-07T08:00:00+5:302023-06-07T08:00:07+5:30

Nagpur News ओडिशात झालेल्या भीषण अपघातानंतर देशभरातून उठलेली टीकेची झोड कमी करण्यासाठी रेल्वे प्रशासनाकडून सुरक्षेच्या खर्चाचा गाजवाजा करण्याचा प्रयत्न सुरू झाला आहे. त्यासाठी रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी सोशल मिडियाचा आधार घेतला आहे.

Railways exaggerate security expenditure to blunt criticism after Odisha accident | ओडिशा अपघातानंतर टीकेची धार बोथट करण्यासाठी रेल्वेकडून सुरक्षेच्या खर्चाचा गाजावाजा

ओडिशा अपघातानंतर टीकेची धार बोथट करण्यासाठी रेल्वेकडून सुरक्षेच्या खर्चाचा गाजावाजा

नरेश डोंगरे
नागपूर : ओडिशात झालेल्या भीषण अपघातानंतर देशभरातून उठलेली टीकेची झोड कमी करण्यासाठी रेल्वे प्रशासनाकडून सुरक्षेच्या खर्चाचा गाजवाजा करण्याचा प्रयत्न सुरू झाला आहे. त्यासाठी रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी सोशल मिडियाचा आधार घेतला आहे.


भारतीय रेल्वेचा सर्वांत भीषण मानला जाणारा अपघात ओडिशातील बालासोरमध्ये २ जूनच्या रात्री घडला. २७५ निर्दोष प्रवाशांचे हकनाक बळी गेल्याने आणि शेकडो प्रवासी जखमी झाल्याने ओडिशातील हा अपघात देश-विदेशात चर्चेला आला आहे.

या भीषण अपघाताचे नेमके कारण कोण आणि त्याला जबाबदार कोण, याची विचारणा होत असतानाच रेल्वेे प्रशासनासह सरकारवरही टिकेची झोड उठली आहे. प्रत्येक वळणावर या अपघाताची चर्चा होत असतानाच रेल्वे अधिकाऱ्यांनी २०१७ ते २०२२ या पाच वर्षांच्या कालावधीतील केलेल्या खर्चाचा आढावा व्हॉटस्अॅप ग्रुपच्या माध्यमातून मांडला आहे.

सुरक्षेवर भारतीय रेल्वेचा खर्च कसा करण्यात आला ते सांगताना २०१७ मध्ये राष्ट्रीय रेल सुरक्षा कोष (आरआरएसके) निधी अंतर्गत सुरक्षेच्या कार्याकरिता अव्यय (नॉन लॅप्सेबल) खर्चासह १ लाख कोटी रुपयांच्या निधीसह स्थापना झाली आणि भारतीय रेल्वेने २०१७ ते २०२२ पर्यंत सुरक्षेच्या कामांवर १ लाख कोटींहून अधिक खर्च केल्याचे म्हटले आहे.
या पाच वर्षांत ट्रॅक नूतनीकरणाचा खर्च सातत्याने वाढला असून २०१७-१८ मध्ये खर्च ८,८८४ कोटी होता, २०२१-२२ मध्ये तो १६,५५८ कोटी झाल्याचे सांगितले आहे. गेल्या ५ वर्षात रेल्वेने यावर ५८,०४५ कोटी रुपये खर्च केल्याचाही दावा केला आहे. वर्ष २००४-२००५ ते २०१३-१४ मधील ४७,०३९ कोटींच्या तुलनेत २०१४-१५ ते २०२३-२४ पर्यंत ट्रॅक नूतनीकरणावर एकूण १,०९,०२३ कोटी खर्च झाल्याचेही म्हहटले आहे.

पूल, लेव्हल क्रॉसिंग गेट्स (आरओबी/ आरयूबी) सिग्नलिंग कामे यांसारख्या सुरक्षेशी संबंधित कामांवरील खर्चाचा आढावा मांडताना २००४-०५ ते २०१३-१४ या कालावधीत ७०,२७४ कोटी खर्च झाला. तर, २०१४-१५ ते २०२३-२४ या कालावधीत १,७८,०१२ कोटी खर्च करण्यात आल्याचे म्हटले आहे.

अपघात अन् सुरक्षेची आकडेवारी

या संबंधाने रेल्वेच्या जनसंपर्क अधिकाऱ्याशी संपर्क करून नेमकी अपघातानंतरच ही सुरक्षेच्या कामांची (निधीची) आकडेवारी मांडण्याची गरज का वाटली, असा प्रश्न केला असता ते याबाबत समाधानकारक काही सांगू शकले नाही.

Web Title: Railways exaggerate security expenditure to blunt criticism after Odisha accident

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.