रेल्वेत नोकरीचे आमिष : ११ लाख, ५० हजार हडपले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 7, 2018 11:02 PM2018-06-07T23:02:20+5:302018-06-07T23:02:36+5:30

रेल्वेत नोकरी लावून देण्याचे आमिष दाखवून दोघांनी येथील एका तरुणाकडून ११ लाख ५० हजार रुपये हडपले. रक्कम घेतल्यानंतर आरोपी टाळाटाळ करीत असल्याचे पाहून, फिर्यादी राजेंद्र रामदास वाहणे (वय ३५) यांनी जरीपटका ठाण्यात तक्रार नोंदवली. पोलिसांनी याप्रकरणी दोघांवर गुन्हा दाखल केला.

In Railwayinducement job: 11 lakh, 50 thousand grabbed | रेल्वेत नोकरीचे आमिष : ११ लाख, ५० हजार हडपले

रेल्वेत नोकरीचे आमिष : ११ लाख, ५० हजार हडपले

Next
ठळक मुद्देनागपूरच्या जरीपटक्यात गुन्हा दाखल

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : रेल्वेत नोकरी लावून देण्याचे आमिष दाखवून दोघांनी येथील एका तरुणाकडून ११ लाख ५० हजार रुपये हडपले. रक्कम घेतल्यानंतर आरोपी टाळाटाळ करीत असल्याचे पाहून, फिर्यादी राजेंद्र रामदास वाहणे (वय ३५) यांनी जरीपटका ठाण्यात तक्रार नोंदवली. पोलिसांनी याप्रकरणी दोघांवर गुन्हा दाखल केला. मोरेश्वरजी बोकडे (वय ३९, रा. अहमदनगर) आणि आकाश सिंग (वय ४०, रा. कोलकाता) अशी आरोपींची नावे आहेत.
वाहणे न्यू इंदोऱ्यातील रिपब्लिकन नगरात राहतात. ते सधन कुटुंबातील आहेत. चांगल्या रोजगाराच्या शोधात असलेल्या वाहणेंना गेल्या वर्षी एका मित्राने रेल्वेत एका वरिष्ठ अधिकाऱ्यासोबत आपले संबंध असल्याचे सांगून, आरोपी बोकडे आणि सिंगसोबत ओळख करून दिली. या दोघांनी वाहणेंना रेल्वेत टीसी (तिकीट तपासणीस) म्हणून नोकरी लावून देण्याचे आमिष दाखवले. त्याबदल्यात आरोपींनी वाहणेंकडून १३ मार्च ते २८ एप्रिल २०१७ या दीड महिन्याच्या कालावधीत टप्प्याटप्प्याने ११ लाख ५० हजार रुपये घेतले. वाहणोंचा विश्वास बसावा म्हणून आरोपींनी त्यांना रेल्वेचे बनावट कॉल लेटर आणि अन्य कागदपत्रे पाठवली. आपण रेल्वेत तिकीट चेकर बनू, अशी कल्पना रंगविणाºया वाहणेंनी रक्कम दिल्यानंतर आरोपींकडे नियुक्तीसाठी तगादा लावला.
प्रत्येक वेळी काही ना काही कारणे सांगून टाळणाऱ्या आरोपींचा वाहणेंना संशय आला. त्यामुळे त्यांनी रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे आरोपी बोकडे आणि सिंगकडून मिळालेली कागदपत्रे दाखवली. ही कागदपत्रे बनावट असल्याचे आणि रेल्वे खात्याचा या कागदपत्रांशी संबंध नसल्याचे स्पष्ट झाले. फसवणूक केल्याचे ध्यानात आल्याने वाहणेंनी आरोपींना आपली रक्कम परत मागतिली असता आरोपींनी वाहणेंसोबत संपर्क तोडला. त्यामुळे त्यांनी जरीपटका ठाण्यात तक्रार नोंदवली. सहायक उपनिरीक्षक भांगे यांनी याप्रकरणी फसवणुकीचा गुन्हा दाखल केला. आरोपींचा शोध घेतला जात आहे.
अनेकांची फसगत
आरोपींनी वाहणेंसारखीच अनेकांची फसवणूक केल्याचा संशय आहे. पोलिसांत गेल्यास आपली रक्कम परत मिळणार नाही, असा धाक असल्याने फसगत झालेले पीडित बरेचदा पोलिसांकडे जाण्याचे टाळतात. या प्रकरणातही अशाप्रकारचे अनेक पीडित असल्याचा संशय आहे. पोलीस त्याची चौकशी करीत आहेत.

Web Title: In Railwayinducement job: 11 lakh, 50 thousand grabbed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.