शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

मालगाडीचा वॅगन पाईप तुटल्यामुळे रेल्वे वाहतूक विस्कळीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 10, 2019 00:59 IST

मध्य रेल्वेच्या नागपूर विभागात नागपूर ते इटारसी मार्गावर गोधनीच्या आधी एका मालगाडीचा वॅगन पाईप तुटल्यामुळे या मार्गावरील रेल्वे वाहतूक विस्कळीत झाली.

ठळक मुद्देनागपूर-इटारसी मार्गावर अडकल्या रेल्वेगाड्या

 लोकमत  न्यूज  नेटवर्कनागपूर : मध्य रेल्वेच्यानागपूर विभागात नागपूर ते इटारसी मार्गावर गोधनीच्या आधी एका मालगाडीचा वॅगन पाईप तुटल्यामुळे या मार्गावरील रेल्वे वाहतूक विस्कळीत झाली. यामुळे तीन रेल्वेगाड्यांना जवळपास एक तास रेल्वेस्थानकावर रोखून धरण्यात आले.मालगाडीचा वॅगन पाईप तुटल्यामुळे नागपूरकडे येणाऱ्या रेल्वेगाड्यांना विलंब झाला. मिळालेल्या माहितीनुसार, दुपारी ४.३० वाजता नागपूरकडून इटारसीकडे जाणाऱ्या एका मालगाडीचा वॅगन पाईप तुटला. मालगाडी रुळावरून घसरू नये, यासाठी लोकोपायलटने त्वरित मालगाडी थांबविली. याबाबत लोकोपायलटने त्वरित नियंत्रण कक्षाला सूचना दिली. अभियांत्रिकी विभागाच्या अधिकाऱ्यांनी त्वरित दुरुस्तीचे काम हाती घेतले. प्रवासी रेल्वेगाड्यांसाठी मार्ग त्वरित मोकळा करणे गरजेचे असल्यामुळे, दुसऱ्या इंजिनच्या मदतीने मालगाडीला गोधनी येथे नेण्यात आले. त्यासाठी एक तासाचा कालावधी लागल्यामुळे या मार्गावरील रेल्वेगाड्यांना विलंब झाला.अहिल्यानगरी, संपर्कक्रांती एक्स्प्रेसला उशीरमालगाडीचा वॅगन पाईप तुटल्यामुळे मेन लाईनवरील वाहतूक ठप्प झाली. काही गाड्यांना नागपूर रेल्वेस्थानकावर थांबविण्यात आले, तर काही गाड्यांना गोधनी, अजनी रेल्वेस्थानकावर रोखण्यात आले. यामुळे १२५२२ एर्नाकुलम-बरौनी अहिल्यानगरी एक्स्प्रेस, १२६४९ यशवंतपूर-हजरत निजामुद्दीन एक्स्प्रेसला प्लॅटफार्म क्रमांक १ आणि २ वर एक तास थांबविण्यात आले. रेल्वेगाडी क्रमांक २२१३५ नागपूर-अमृतसर एक्स्प्रेसला प्लॅटफार्म क्रमांक ६ वर थांबवून ३५ मिनिटानंतर रवाना करण्यात आले. १२७२२ हजरत निजामुद्दीन-हैदराबाद दक्षिण एक्स्प्रेसला गोधनी येथे थांबविण्यात आले. ही गाडी नागपुरात ५० मिनिटे उशिरा पोहोचली. १२२९६ दानापूर-बेंगळुरू एक्स्प्रेस ४८ मिनिटे आणि २२३५१ पाटलीपुत्र- यशवंतपूर एक्स्प्रेस २७ मिनिटे उशिरा पोहोचली.

टॅग्स :railwayरेल्वेnagpurनागपूर